पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात तयार झालेला 'थाळसर-बांगसर'या लघुपपटाला राष्ट्रीय पुरस्कार

भरत बागुल
Tuesday, 19 January 2021

मुख्य कलाकार आणि लोकेशन ऐनवेळेस उपलब्ध न होऊ शकल्याने थाळसर बांगसर हा विषय समोर आला आणि पुढे इतिहास झाला..

पिंपळनेर : येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा सावरपाडा येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक रविंद्र जाधव यांनी निर्माण केलेल्या 'थाळसर-बांगसर'या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार नवी दिल्ली चा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून खान्देशच्या पश्चिम पट्ट्यातील लोप पावत चाललेल्या थाळसार बांगसर या वाद्यावर आधारित या लघुपटाला हा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

आवश्य वाचा- प्रचाराला गावात न फिरला..न मतदान केले; तरी 'तो' निवडणूकीत विजयी झाला, हे कसे झाले शक्य ? वाचा सविस्तर 
 

सदर लघुपटाचे चित्रीकरण सावरपाडा आणि टाकरमौली या गावात झाले असून यामध्ये तेथिलच स्थानिक कलाकारांच्या या मध्ये सहभाग आहेत.या अगोदर देखील प्राथमिक शाळेवर शिक्षक असलेल्या रविंद्र जाधव यांनी या पूर्वी शाळाबाह्य, प्रखर ,निरोध अशा लघुपटाची निर्मिती,लेखन व दिग्दर्शन केले आहे .या स्पर्धेकरिता देशभरातून लघुचित्रपट आले असता रवींद्र जाधव यांच्या निर्मितीला प्रथम क्रमांक मिळाल्याने खानदेशचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.

आवश्य वाचा- कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला! 
 

या चित्रपटाविषयी अधिक माहिती देतांना रवींद्र जाधव म्हणाले " लघुपटा ऐवजी खरंतर मला दुसरा लघु चित्रपट तयार करायचा होता,पण त्यातील मुख्य कलाकार आणि लोकेशन ऐनवेळेस उपलब्ध न होऊ शकल्याने थाळसर बांगसर हा विषय समोर आला आणि पुढे इतिहास झाला. या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती रवींद्र जाधव यांची असून, छायांकन भूषण गनूरकर, संकलन-दीपक देशमुख, कला-चेतन बहिरम, संगीत-दोधा पवार, छायांकन सहकार्य-प्रतीक कुंभार, ध्वनी संकलन-रेडियो पांझराचे आर.जे.जयवंत कापडे, राहुल ठाकरे, is इंग्रजी भाषांतर- रोहिदास घरटे यांचं असून यामध्ये मुख्य भूमिकेत-दोधा पवार, दिव्या गायकवाड ,चोटीराम चौरे, राणी बहिरम आणि रवींद्र बहिरम हे स्थानिक कलाकार आहेत. या करिता टाकरमौली आणि सावरपाडा येथील नागरिकांचे सहकार्य लाभले. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule shot movie thalasar bangsir national award