कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या टप्प्यावर 

रमाकांत गोदराज
Wednesday, 19 August 2020

जिल्हाभराची स्थिती पाहिली तर यापूर्वी महापालिका क्षेत्रात मृतांचा आकडा जास्त होता. आता मात्र उर्वरित जिल्ह्यात अर्थात ग्रामीण भागात मृतांचा आकडा वाढल्याचे चित्र आहे. 

धुळे  : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी (ता. १८) खाली आला असला, तरी शंभरावर बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या टप्प्याजवळ पोचला. कोरोनामुळे मृतांची संख्याही चारने वाढली. जिल्ह्यात आतापर्यंत १८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. जिल्हाभराची स्थिती पाहिली तर यापूर्वी महापालिका क्षेत्रात मृतांचा आकडा जास्त होता. आता मात्र उर्वरित जिल्ह्यात अर्थात ग्रामीण भागात मृतांचा आकडा वाढल्याचे चित्र आहे. 

गेल्या काही दिवसांत दीडशे-दोनशे कोरोनाबाधितांची भर पडत होती. मंगळवारी हा आलेख थोडा खाली आला तरी ४१९ अहवालांपैकी १०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता पाच हजार ८९५ वर पोचला. चार मृतांचीही भर पडली. अर्थे (ता. शिरपूर) येथील ६७ वर्षीय महिला, वाघाडी (ता. शिरपूर), येथील ५५ वर्षीय पुरुष, न्याहळोद (ता. धुळे) येथील ५५ वर्षीय पुरुष, तर धुळ्यातील देवपूर भागातील ५० वर्षीय पुरुषाचा (पुणे येथे मृत्यू) यात समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १८१ झाली. यात धुळे महापालिका क्षेत्रातील ८७, तर उर्वरित जिल्ह्यातील ९४ जणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित : जिल्हा रुग्णालय, धुळे (बाधित ४६) ः साक्री रोड, रामदासनगर महिंदळे (दोन), धुळे (पाच), वैद्यनगर (पाच), कृषी कॉलनी, पाटीलनगर, रामचंद्रनगर, पद्मनाभनगर (दोन), शीतल कॉलनी, सोनगीर (तीन), जापी, नेर, फागणे (दोन), नगाव (दोन), वाडणे (चार), जमजिरा साक्री, बाळापूर, जापी, देऊर (तीन), म्हसदी (दोन), नेर (दोन), खेडे, शिरूड, जुने धुळे, चिमठाणे. उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा (पाचपैकी एकही नाही). उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर (बाधित-८)- चौधरी गल्ली, शिरपुर, व्यंकटेश नगर, मारवाडी गल्ली, नारायण नगर, तऱ्हाडी (दोन), खुरखली. भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (बाधित १९) ः जैताणे (आठ), पिंपळनेर (तीन), कावठे (पाच), दहिवेल, शिवाजीनगर, साक्री, रूपालीनगर, साक्री. महापालिका पॉलिटेक्निक कोविड सेंटर (बाधित २६) ः गल्ली नंबर- ४, जुने धुळे (तीन), विष्णूनगर (दोन), वैद्यनगर, गुरुदत्त कॉलनी (दोन), राजारामनगर, सप्तशृंगी कॉलनी, पद्मनाभनगर (तीन), रमाबाई चौक, चितोड रोड, वाडीभोकर रोड (दोन), अष्टविनायकनगर (दोन), जैताणे (दोन), सुपडूआप्पा कॉलनी (दोन), गवळेनगर, सुदर्शन कॉलनी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (बाधित १०) ः शिरपूर (दोन), सोनगीर, जानकीरामनगर, शिरपूर, साक्री (दोन), शिंदखेडा, जुने धुळे, धुळे (दोन). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule situation in dhule district the number of corona victims is close to six thousand