
कुसुंबा बायपासजवळील मोठा खड्डा प्रवाशांचा डोकेदुखी ठरत असल्याने स्वतः कुदळ-फावडे घेत जवळच पडलेल्या ढिगाऱ्यांतून मुरूम घेत खड्डे बुजविले.
कुसुंबा ः नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे ते नवापूरदरम्यानचे काम अनेक दिवसांपासून ठप्प झाले आहे. काही ठिकाणी संथगतीने सुरू आहे. हा महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारकांना होणारा त्रास पाहता धुळे आगाराचे एस टी चालक, शिक्षकाने गांधिगीरी करत स्वःता पुढाकार घेत मुरूमद्वारे कुदळ फावडे घेत हे खड्डे बुजविण्याचे काम केले.
आवश्य वाचा- ‘वजन’ कमी भरले म्हणून ‘ट्री-गार्ड’उचले; धुळे मनपातील घोळ
फागणे ते नवापूर सीमेपर्यंत १४० किलोमीटरदरम्यान वाहनचालकांना खड्डे टाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अपघातही होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने काम दिलेल्या कंपनीकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र, आठवडाभरात स्थिती जसै-थे होते.धुळे, मोराणे, आनंदखेडे, कुसुंबा, नेर, साक्रीदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत व धूळही उडत आहे.
आणि हाती घेतले कुदळ. फावडा
कुसुंबा व धुळे आगारातील चालक सुनील शिंदे व उषा प्रकाश प्रतिष्ठानचे तथा माध्यमिक शिक्षक रणजित शिंदे यांनी गांधीगिरी करीत कुसुंबा बायपासजवळील मोठा खड्डा प्रवाशांचा डोकेदुखी ठरत असल्याने स्वतः कुदळ-फावडे घेत जवळच पडलेल्या ढिगाऱ्यांतून मुरूम घेत खड्डे बुजविले. यामुळे अनेकांनी कौतुकही केले, तर काहींनी खड्डे बुजविण्यास सहकार्यही केले.
गांर्भियाने लक्ष देण्याची गरज
महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्य लक्षात घेऊन कामाची गती वाढवून महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशा प्रतिक्रिया वाहनधारकांसह ग्रामस्थांनी व्यक्त करत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे