esakal | इच्छाशक्तीच्या जोरावर कुसुंब्यांचा पुत्र बनला विक्रीकर सहाय्यक !
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छाशक्तीच्या जोरावर कुसुंब्यांचा पुत्र बनला विक्रीकर सहाय्यक !

एमपीएससी, युपीएससी च्या माध्यमातुन क्लास वन क्लास टू च्या तब्बल सतरा वेळेस परीक्षा दिल्या मात्र फक्त तीन ते चार मार्कांसाठी यश हुलकावणी देत होते.

इच्छाशक्तीच्या जोरावर कुसुंब्यांचा पुत्र बनला विक्रीकर सहाय्यक !

sakal_logo
By
विनोद शिंदे

धुळेः  दुर्दम्य इच्छाशक्ती , जिद्द अन् चिकाटीने यशश्री आपल्या गळ्यात निश्चितच माळ घालते हे वास्तव सत्य कुसुब्यांतील कुंदन विकास शिंदे यांनी अठराव्या प्रयत्नांत विक्रिकर सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवून दिले आहे. 

ऑक्टोबऱ 2019 मध्ये  महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत  घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच घोषीत झाला त्यात कुसुंबा ( ता. धुळे ) येथील कुंदन विकास शिंदे यांने विक्रीकर सहाय्यक (sales Tax Assistant ) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातुन आठव्या रँकने उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे .त्यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. कुंदन शिंदे यांनी एमपीएससी, युपीएससी च्या माध्यमातुन क्लास वन क्लास टू च्या तब्बल सतरा वेळेस परीक्षा दिल्या मात्र फक्त तीन ते चार मार्कांसाठी यश हुलकावणी देत होते , मात्र कुंदन शिंदेंनी चिकाटी व ध्येय सोडले नाही अठराव्या प्रयत्नांत यशश्री ने कुंदनच्या गळ्यात यशाची माळ घातली अन् सामान्य कुंटूबातील कुंदन विक्रीकर सहायक बनला हि बाब कुंटुंबासाठी, गiवासाठी अभिमानास्पद ठरली आहे. 

क्लास विना मिळवीले यश 
कुंदन शिंदे यांचे वडिल विकास रामदास शिंदे , काका दिलीप रामदास शिंदे यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे , शेतकरी कुटूबांतील कुंदनने मोठे यश संपादन केल्याने युवक वर्गासाठी त्याचे यश आदर्शवत आहे .विशेष म्हणजे कुठलाही महागडा क्लास न लावता सेल्फ स्टडीतुन हे यश मिळविले आहे. सतत नऊ ते दहा तास अभ्यास करीत असत , विद्यार्थ्यानी ध्येय व चिकाटी ठेवली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही असे कुंदन शिंदे याने मत व्यक्त केले , त्यांचे खासदार सुभाष भामरेंसह , गुरुजन, मित्रपरिवार , समस्त कुसुंबा ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top