दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीला विराम; राज्‍यातील स्‍थिती 

जगन्नाथ पाटील
Thursday, 15 October 2020

राज्यातील दहा हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त आहे. दोन्ही वर्षांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यासाठी प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

कापडणे (धुळे) : पुर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पुर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी अद्याप घोषीत होण्यास अवकाश आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यास सलग तीन वर्षे प्रती वर्ष हजारप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील दहा हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त आहे. दोन्ही वर्षांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यासाठी प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दहा हजारावर विद्यार्थी वंचित
गेल्या साठ वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा सुरु आहे. विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवत्ती दिली जाते. जिल्हानिहाय किमान शंभर विद्यार्थ्यांची गुणवत्तानिहाय शिष्यवृत्तीसाठी निवड होत असते. दोन वर्षांपासून दहा हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच प्रदान करण्यात आलेली नाही शिष्यवत्तीसाठी सुमारे एक कोटीची तरतूद होणे आवश्यक आहे. शिष्यवती मिळत नसल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

शिष्यवृत्तीत वाढ हवी
गेल्या पाच वर्षांपासून वार्षिक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. यात वाढ करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. यासाठी दीपक पाटील कापडणे राकेश पाटील नगाव भैरुलाल पाटील नगाव, हंसराज कदम धमाणे समाधान पाटील फागणे आदी निवेदन देणार आहेत.

खरोखर शिक्षणाकडे लक्ष आहे का ?
शिष्यवत्ती परीक्षेचा निकाल आठ महिन्यांनंतर लागला. निकाल लागण्या अगोदरच पुढील परीक्षेचे वेळापत्रक घोषीत झाले. दोन तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाचे खरोखर शिक्षणाकडे लक्ष आहे का, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

पाचवी शिष्यवत्ती परीक्षेत गुणवत्तेत आलो. आता नववीत पोहचलो. पण एकदाच शिष्यवत्ती मिळाली आहे. मला वेळेवर शिष्यवत्ती मिळायला हवी होती. मी शिष्यवृत्तीची रक्कम गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी देत असतो.
- सुयोग पाटील, राजे संभाजी विद्यालय देवपूर, धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule student shishyavrutti not distribute last two year