esakal | १६८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

crop percentage announced

धुळे तालुक्यातील १७० गावांची खरीप पिकांची पैसेवारी मंडळातील ग्रामपंचायत निहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर निश्चित केली आहे. त्यात खरीप हंगामातील पन्नास पैसे पेक्षा जास्त पैसेवारीमध्ये १६८ गावांचा समावेश आहे.

१६८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊर (धुळे) : धुळे तालुक्यातील २०२०-२१ या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी (आणेवारी) तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केली आहे. प्रातांधिकारी भिमराज दराडे यांनी त्यास मंजूरी दिली आहे. 
धुळे तालुक्यातील १७० गावांची खरीप पिकांची पैसेवारी मंडळातील ग्रामपंचायत निहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर निश्चित केली आहे. त्यात खरीप हंगामातील पन्नास पैसे पेक्षा जास्त पैसेवारीमध्ये १६८ गावांचा समावेश आहे. धुळे तालुक्यात रब्बी गावांचा समावेश नसल्याने रब्बी गावांची पैसेवारी जाहीर करण्याचा प्रश्नच नाही. धुळे तालुक्यात १७० गावे महसूली आहेत. पैकी महाल पांढरी व महाल लोंढा हे दोन गावे उजाड आहेत. बिनशेतीकडे व पाझर तलावाकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे १६८ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याचा शासनस्तरावरून निर्णय झाला आहे. 

तेरा गावे मनपा क्षेत्रात
अतिवृष्टीमुळे ऐन काढणीवर आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता आहे. त्यातच तालुक्याची पैसेवारी ५० पैसापेक्षा जास्त जाहीर झाली आहे. १६८ गावांपैकी १३१ ग्रामपंचायतीत १५५ गावांचा ग्रामीण भागात समावेश होतो. तर १३ गावांचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश होतो.

गावनिहाय जाहीर झालेली पैसेवारी (कंसात पैसेवारी) 
बल्हाणे (५९ पैसे), धुळे, देवपुर, वलवाडी, अवधान, बाळापुर, अजंग, आंबोडे, मळाणे, नगाव खु., आर्णी, पाडळदे, अजनाळे (६० पैसे). दह्याणे, हेंद्रुण, नंदाळे बु. चांदे (६२ पैसे).
खेडे, निमडाळे, रावेर, आर्वी, लळींग, हेंकळवाडी, मोरशेवडी, सोनगीर, देवभाने, मेहेरगांव, देऊर बु., देऊर खु., बोरकुंड, मांडळ, तरवाडे, खोरदड (६३ पैसे). सुट्रेपाडा, कुंडाणे(वार), उडाणे, सांजोरी, वार, गोंदुर, भोकर, चितोड, तिसगांव, अनकवाडी, पुरमेपाडा, बेंद्रेपाडा, सोनेवाडी, धाडरी, कुळथे, दिवानमळा, जुन्नेर, तिखी, रानमळा, सावळदे, दापुरी, दापुरा, सरवड, कापडणे, धनुर, लोणकुटे, कौठळ, मोहाडी प्र.डां., अकलाड, भदाणे, पिंपरखेडे, मोघण, नाणे, मोरदड (६४ पैसे), महिंदळे, मोहाडी प्र.ल., मोराणे प्र.ल., नकाणे, फागणे, वरखेडे, काळखेडे, नंदाळे खु., कासविहीर, नवलनगर, नावरा, नावरी, सातरणे, वणी, वडगांव, ढंढाणे, धोडी, धाडरा,धाडरी, सडगांव, हेंकळवाडी, तामसवाडी, गोताणे, मोराणे प्र.नेर, कावठी, खंडलाय बु., खंडलाय खु., रामी, बोदगांव, हाडसुणे, होरपाडा, सिताणे, मोरदड तांडा, भिरडाई, भिरडाणे, अंचाळे, अंचाळे तांडा, वेल्हाणे, कुंडाणे वेल्हाणे, तांडा कुंडाणे, गाडउतार, नरव्हाळ, पिंपरी (६५ पैसे). नगांव, वडेल, बिलाडी, धमाणे, धमाणी, विश्वनाथ, सुकवड प्र.डां., लोहगड, म.रायवट, म.कानडामाना, उभंड, नांद्रे, शिरधाणे प्र.नेर, लामकानी, बोरसुले, नवेकोठारे, नंदाणे, शिरुड, बाबरे, जुनवणे, दोंदवाड, वणी खु., मुकटी, चिंचखेडा, सावळी, सावळी तांडा, आमदड, वजीरखेडे, वडजाई, सौंदाणे, बाभुळवाडी (६६ पैसे). कुंडाणे(वरखेडी), निमखेडी, न्याहळोद, शिरडाणे प्र.डां., चौगांव, हिंगणे, लोणखेडी, महाल काळी, बांभुर्ले प्र.नेर, सैताळे, निकुंभे, बुरझड, वडणे, नवलाणे, निमगुळ, विंचुर (६७ पैसे). जापी, कुसुंबा, महाल नूरनगर, बेहेड, बोरीस, सायने, चिंचवार, बोरविहीर, विसरणे, धामणगांव(६८ पैसे), महाल मळी, म.कसाड (६९ पैसे) यानुसार नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली आहे.

काय आहे पैसेवारी 
धान्याच्या उत्पादनाशी निगडीत ही शेतीमधील विशिष्ट पिकांचे उत्पन्न काढण्याची सरकारी पद्धत आहे. ही नजर अनुमानाने काढण्यात येते. यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडले जातात. पीक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी (तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते. खरीपाची हंगामी पैसेवारी कोकण, पुणे, नाशिक या राजस्व विभागात दरवर्षी १५ सप्टेंबरला तर  नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागात ३० सप्टेंबरला जाहीर होते. अंतिम पैसेवारी ही अनुक्रमे १५ डिसेंबरपूर्वी व १५ जानेवारीपूर्वी जाहीर होते. गावांचे शिवारात एकुण पेरलेल्या वा लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाचे ८० टक्के पर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात.