esakal | धुळे तालुक्‍यात बिनविरोध ग्रा.पं.वर काँग्रेसचेच वर्चस्व 
sakal

बोलून बातमी शोधा

congress

धुळे तालुक्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या पुढेही आपली सत्ता कायम राखण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

धुळे तालुक्‍यात बिनविरोध ग्रा.पं.वर काँग्रेसचेच वर्चस्व 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : धुळे तालुक्‍यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीच्या माघारीअंती बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. आमदार कुणाल पाटील यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत एकोप्याचे दर्शन घडविले आहे. 
माघारीनंतर आमदड, दापुरा, बोरविहीर, सांजोरी, चिंचवार या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर गरताड ग्रामपंचायतीवर ६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरीत तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दरम्यान निवडणूक लागलेल्या गावांमध्ये बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांवरही काँग्रेस पक्षाचेच उमेदवार निवडूण आल्याने पुन्हा एकदा तालुक्यावर आमदार पाटील यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. 
धुळे तालुक्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या पुढेही आपली सत्ता कायम राखण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिंचवार, सांजोरी, दापुरा, आमदड, बोरविहीर या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. तसेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे बहूमत सिध्द होईल. एवढे ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात गरताड (६ जागा बिनविरोध), तरवाडे (९ जागा बिनविरोध), पुरमेपाडा (८ जागा बिनविरोध), मोरदड (६ जागा बिनविरोध), बोरसुले (६जागा बिनविरोध) या ग्रामपंचायतींवर बिनविरोध जागा मिळवत काँग्रेसने राखल्या आहेत. 

२५ लाखाचा निधी मिळणार
दरम्यान धुळे तालुक्यातील विकासाला चालना मिळावी आणि निवडणूकांमुळे गावागावात वादविवाद, भांडणतंटा होवू नये म्हणून आमदार पाटील यांनी बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक घडविण्यासाठी आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.बिनविरोध निवडणूक घडविणाऱ्या ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी विविध योजनेतून २५ लक्ष रुपयाचा विकास निधी आमदार पाटील यांच्याकडून दिला जाणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image