esakal | धुळे महामार्गावर कंटेनर- दुधाच्या टँकर मध्ये भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे महामार्गावर कंटेनर- दुधाच्या टँकर मध्ये  भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू !

टैंकरने धडक देताच पेट घेतला. वेळेवर आग विझवल्यामूळे आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला . तीनही गम्भीर झालेल्या ना हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी घेऊन गेले.

धुळे महामार्गावर कंटेनर- दुधाच्या टँकर मध्ये भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू !

sakal_logo
By
नितीन पाटील

धुळे : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर अपघाताचे सत्र सुरूच असून आज नगावबारी येथे कंटेनर व दुधाचे टँकर मध्ये मध्ये पहाटे 3 वाजता भीषण अपघात झाला आहे. या अपघातात केंटनरनेने पेट घेतला. तर आगीत तीन जण  होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

मुंबई-धुळे आग्रा महामार्गावर सलग दुसऱया दिवशी भीषण अपघात झाले आहे. आज पहाटे नगावबारी जवळ कंटेनर चे चाक पंकचर झाले. महामार्गावर कंटेनर उभा करून ड्रायव्हर क्लिनर  गाडीच चाक खोलत असताना मागून आलेल्या दुधाचे टॅंकरने त्याना जोरदार धडक दिली. त्यामुळं एक जण जागी च ठार झाला तीन जण गंम्भीर जखमी झाले आहेत. टैंकरने धडक देताच पेट घेतला. वेळेवर आग विझवल्यामूळे आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला . तीनही गम्भीर झालेल्या ना हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी घेऊन गेले. पी. एस.आय श्री. सैय्यद पुढील तपास करित आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे