esakal | धुळ्यात बारा लाखांवर पुस्तक संचांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात बारा लाखांवर पुस्तक संचांची गरज

धुळ्यात बारा लाखांवर पुस्तक संचांची गरज

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी, धुळे

धुळे : काही नियमांचे पालन करून १५ जुलैपासून आठवी ते दहावीचे (10th) वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) मान्यता दिली आहे. मात्र, कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या ( corona third wave)भीतीमुळे पाल्यांना शाळेत (School) पाठविण्यास बहुतांश पालकांची तयारी नसल्याचे शहरासह जिल्ह्यातील चित्र आहे. त्यात दोन लाख ३३ हजारांवर विद्यार्थ्यांना १२ लाखांवर पुस्तक (School book) संचांची गरज भासणार आहे. (twelve lakh school book sets needed in dhule)

हेही वाचा: धुळे जिल्‍ह्यात फळ पीक विमा योजना लागू

गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. असे असूनही ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकेच उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दर वर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. यंदा क्रमिक पुस्तके अद्याप उपलब्ध नसल्याने विद्यार्थी पुस्तकापासून वंचित आहेत.

हेही वाचा: एकत्र येऊन धुळे जिल्‍ह्यात परिवर्तन करा- नाना पटोले

पाठ्यपुस्तकांची मागणी

समग्र शिक्षा अभियानाच्या स्थानिक कार्यालयाकडून यापूर्वीच पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविलेली आहे. जिल्ह्यात दोन लाख ३३ हजार ८७४ विद्यार्थ्यांना १२ लाख ३९ हजार ५३३ पुस्तक संचांची आवश्यकता आहे. त्यात धुळे तालुक्यात ६१ हजार ४५१ विद्यार्थ्यांसाठी तीन लाख ३२ हजार ६७९, साक्री तालुक्यात ७१ हजार ४५० विद्यार्थ्यांसाठी चार लाख ४६७, शिंदखेडा तालुक्यात ४१ हजार ९०६ विद्यार्थ्यांसाठी एक लाख ६६ हजार २३५, शिरपूर तालुक्यात ५९ हजार ६७ विद्यार्थ्यांसाठी तीन लाख ४० हजार १४१ पुस्तक संचांची मागणी नोंदविण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शिक्षण विभागातर्फे जुनी पुस्तके संकलित करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनानुसार काही शाळांनी प्रयत्न केले, तर काही शाळांनी दुर्लक्ष केले. पुस्तक परत करण्याच्या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे परत आलेल्या पुस्तक संचांची संख्या कमीच आहे.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात पाऊस लांबला, बळीराजा धास्तावला

विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविना

गावपातळीवर प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांची पुस्तकांची देवाणघेवाण करत सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात हजारो विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविना आहेत.

loading image