धुळे जिल्ह्यात पाच जागांसाठी 70 उमेदवार 

धुळे जिल्ह्यात पाच जागांसाठी 70 उमेदवार 

धुळे ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत दिग्गजांसह इतर इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. मुदतीअखेर जिल्ह्यातील पाच जागांसाठी तब्बल 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, उद्या (ता. 5) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. तसेच 7 ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 

विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या प्रक्रियेच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळली. त्यातही आज शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांकडून कोण उमेदवारी दाखल करणार याची उत्सुकता होती. ती आज संपली. मुदतीअखेर आज एकूण 70 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात सर्वाधिक 20 उमेदवार साक्री मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत. त्याखालोखाल धुळे शहर मतदारसंघात 19, धुळे ग्रामीण व शिरपूर मतदारसंघात प्रत्येकी 11, तर शिंदखेडा मतदारसंघात एकूण 9 उमेदवारांनी अर्ज सादर केले. 

धुळे शहरात 19 उमेदवार 
धुळे शहर मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात हिलाल माळी (शिवसेना), अनिल गोटे (अपक्ष), राजवर्धन कदमबांडे (अपक्ष), प्राची कुलकर्णी (मनसे), डॉ. माधुरी बोरसे (अपक्ष), डॉ. फारुख शाह (एमआयएम), रवींद्र दामोदर (बसप), रणजित भोसले (अपक्ष), हर्षवर्धन दहिते (अपक्ष), ललित मोरे (अपक्ष), मयूर अहिरराव (अपक्ष), गोरख शर्मा (अपक्ष), मन्सुरी आसिफ इनायत (अपक्ष), शंकर थोरात (अपक्ष), सलीम शेख गनी (अपक्ष), हेमलता सोनवणे (अपक्ष), शेख रोशन शेख सत्तार (अपक्ष), विवेक सत्तार (अपक्ष), जितेंद्र मोरे (अपक्ष). 

धुळे ग्रामीणमध्ये 11 उमेदवार 
धुळे ग्रामीण मतदारसंघातील 11 उमेदवार असे ः ज्ञानज्योती भदाणे (भाजप), मनोहर पाटील (भाजप), कुणाल पाटील (कॉंग्रेस), राजदीप आगळे (वंचित बहुजन आघाडी), भाऊसाहेब पवार (महाराष्ट्र क्रांती सेना व अपक्ष), नंदू सुकदेव बैसाणे (बसप), डॉ. भूपेश पाटील (अपक्ष), जगन्नाथ बैसाणे (अपक्ष), संतोष मासुळे (अपक्ष), अंकुश सोनवणे (अपक्ष), राहुल जोशी (अपक्ष). 

शिरपूरमध्ये 11 रिंगणात 
शिरपूर मतदारसंघातील 11 उमेदवार असे ः विद्यमान आमदार काशिराम पावरा (भाजप), डॉ. जितेंद्र ठाकूर (भाजप व अपक्ष), डॉ. शीतल जितेंद्र ठाकूर (भाजप), विकास सैंदाणे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), साहेबराव ठाकरे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), सुक्राम पावरा (बहुजन समाज पक्ष), मोतीलाल सोनवणे (वंचित बहुजन आघाडी), किशोर भिल (मानव एकता पक्ष), पांडुरंग भिल (बहुजन मुक्ती पक्ष), रणजित भरतसिंग पावरा (कॉंग्रेस), ऍड. रणजित माला पावरा (अपक्ष). 

साक्रीतून 20 उमेदवार 
साक्री मतदारसंघातील वीस उमेदवार असे ः विद्यमान आमदार डी. एस. अहिरे (कॉंग्रेस), धीरज धनाजी अहिरे (कॉंग्रेस), मोहन सूर्यवंशी (भाजप), लीला मोहन सूर्यवंशी (भाजप), मंजुळा गावित (अपक्ष), डॉ. तुळशीराम गावित (अपक्ष), डॉ. जितेश चौरे (अपक्ष व भाजप), रंगनाथ भवरे (बसप), यशवंत माळचे (वंचित बहुजन आघाडी), रामलाल गवळी (वंचित बहुजन आघाडी), नंदू माळचे (भा. ट्रा. पार्टी व अपक्ष), राजकुमार सोनवणे (अपक्ष), अनिल बागूल (भाजप व अपक्ष), हिरामण साबळे (अपक्ष), टिकाराम बहिरम (अपक्ष), धर्मेंद्र बोरसे (अपक्ष), दरेसिंग माळचे (अपक्ष), विक्रम महाले (अपक्ष), कमिशन चव्हाण (अपक्ष), संदीप चौरे (अपक्ष). 
 
शिंदखेड्यातून नऊ उमेदवार 
शिंदखेडा मतदारसंघातील नऊ उमेदवार असे ः मंत्री जयकुमार रावल (भाजप), दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुवर रावल (भाजप), संदीप बेडसे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), नरेंद्र धर्मा पाटील (मनसे), नामदेव येळवे (वंचित बहुजन आघाडी), भाऊसाहेब पवार (बहुजन समज पार्टी), शानाभाऊ सोनवणे (अपक्ष), गणेश वाडीले (अपक्ष), सलीम कासम पिंजारी (अपक्ष). 


70 उमेदवारांचे 104 अर्ज 
विधानसभा निवडणुकीसाठी आजअखेर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून 70 उमेदवारांनी 104 अर्ज दाखल केले. यात काही दिग्गज उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही अर्ज आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवार व अर्ज (कंसात) असे ः साक्री- 20 (28), धुळे ग्रामीण- 11 (17), धुळे शहर- 19 (30), शिंदखेडा- 09 (14), शिरपूर- 11 (15). दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद दाणेज (साक्री), भीमराज दराडे (धुळे ग्रामीण), डॉ. श्रीकुमार चिंचकर (धुळे शहर), सुरेखा चव्हाण (शिंदखेडा), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com