Video जखमी विव्हळत राहिले अन्‌ अनेकांनी नेले दारूचे बॉक्‍स 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

धुळे : माणूसकी जपत जण मदतीचा हात पुढे करत असतात. परंतु दारूची बाटली दिसली आणि माणुसकी हरपली असाच अनुभव चिमठाणेलगत आज झालेल्या अपघाता दरम्यान पाहण्यास मिळाला. विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतुक करणार ट्रक पलटल्यानंतर जखमी चालकास मदत करण्याचे सोडून दारूच्या बाटल्या आणि ग्लास उचलण्यात नागरीक व्यस्त झाले होते. 

धुळे : माणूसकी जपत जण मदतीचा हात पुढे करत असतात. परंतु दारूची बाटली दिसली आणि माणुसकी हरपली असाच अनुभव चिमठाणेलगत आज झालेल्या अपघाता दरम्यान पाहण्यास मिळाला. विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतुक करणार ट्रक पलटल्यानंतर जखमी चालकास मदत करण्याचे सोडून दारूच्या बाटल्या आणि ग्लास उचलण्यात नागरीक व्यस्त झाले होते. 

धुळ्याकडून नंदुरबारकडे विदेशी दारू घेवून जाणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे ट्रक पलटी होवून त्यातील सर्व दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या होत्या. सदर अपघात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यातील चिमठाणेजवळील पुलावर झाला. त्यामुळे ट्रकमधील विदेशी दारूचे बॉक्‍ससह इतर साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. 

हेपण पहा - महामार्गावरील मृत्यू...उदासीन लोकप्रतिनिधी, ढिम्म यंत्रणेचे बळी

बाटल्या उचलण्यासाठी रांगा 
अपघातस्थळावर अनेकांची गर्दी झाली होती. नागरिकांसह रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी दारूचे बॉक्‍स, बाटल्यांसह काचेचे ग्लास, वाट्या असा लाखोंचा माल वाहुन नेला. दारूच्या बाटल्या घेण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती. दरम्यान अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे दोन ते तीन कि.मी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर अनेक बॉक्‍समधील बाटल्या फुटून लाखोंचे नुकसान झाले आहे. 

ट्रकचालक गंभीर तरीही... 
अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चिमठाणे गावातील नागरिकांनी मदतीचा हात देत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांनी जखमी चालकाकडे फारशे लक्ष न देता एक- दोन मिळेल तसा बॉक्‍स उचलून नेले. परंतु जखमीस मदत केली नाही. मुख्य म्हणजे जखमी अवस्थेत बॉक्‍स उचलून नेणाऱ्यांना नेऊ नका म्हणून सांगणाऱ्याकडे देखील लक्ष देत नव्हते. तसेच काही नागरीक दारूच्या बाटल्या उचलणाऱ्यांना जखमीला मदत करा...कधी दारू पेत शेतस का नही रे असे म्हणून रोखत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule wine truck accident chimthane road