esakal | दोंडाईचा येथील देशमुख गट पुन्हा राष्ट्रवादीत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

दोंडाईचा येथील देशमुख गट पुन्हा राष्ट्रवादीत ! 

भाजपचे फडवणीस सरकार भ्रष्ट, दलाल, लबाडांचे सरकार होते, अशी टीका श्री. गोटे यांनी केली. संचालक अमित पाटील यांनी मध्यंतरीच्या काळात राजकीय द्वेषापोटी अनेक यातना भोगाव्या लागल्या.

दोंडाईचा येथील देशमुख गट पुन्हा राष्ट्रवादीत ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

दोंडाईचा ः येथील माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या समर्थकांनी व्यापारी भवनातील कार्यक्रमात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत डॉ. देशमुख यांच्यासह समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर घरकुल योजनेचा वाद ऐरणीवर आल्यावर देशमुख गटाने भाजपमध्ये प्रवेश केला. तेथे घरोबा न झाल्याने देशमुख गटाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

वाचा- कापडण्याहून सुरतला पोहोचतो रोज 50 टन मुळा

डॉ. देशमुख यांचा पक्षीय प्रवेश मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होण्याची शक्यता आहे. ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संचालक अमित पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे व रामभाऊ माणिक, माजी सभापती अनिता देशमुख, नाजीम शेख, प्रमिला पाटील, रेणुका सोनवणे, ललीत वारूळे, भूपेंद्र धनगर, माजी नगरसेवक गिरधारीलाल रामरख्या, दिलीप पाटील, अस्लम शहा, कैलास वाडीले, जब्बार बागवान, प्रतिक देशमुख, बाजार समितीचे संचालक रतन भिल, वीरेंद्र गोसावी, छोटू सोनवणे, सलीम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, प्रशांत भदाणे, विजय वाघ आदी उपस्थित होते. 


श्री. गोटे म्हणाले, की घरकुल प्रकरणी डॉ. देशमुख यांना असमर्थनीय वागणूक मिळाली त्याबदल्यात राग आगामी दोंडाईचा पालिकेच्या निवडणुकीत दिसावा. निवडणुकीत सर्व २५ नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे फडवणीस सरकार भ्रष्ट, दलाल, लबाडांचे सरकार होते, अशी टीका श्री. गोटे यांनी केली. संचालक अमित पाटील यांनी मध्यंतरीच्या काळात राजकीय द्वेषापोटी अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे तह करण्याची भूमिका घ्यावी लागली, असे सांगितले. छोटू सांगळे यांनी प्रास्ताविक केले. वीरेंद्र गोसावी यांनी आभार मानले.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे