अचानक लांडग्यांच्या टोळीने केला हल्ला; आणि एकच गोंधळ उडाला !

अचानक लांडग्यांच्या टोळीने केला हल्ला; आणि एकच गोंधळ उडाला !

 दोंडाईचा ः मालपुर (ता. शिंदखेडा) येथे गुरूवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर सात ते आठ लांडग्यांच्याटोळीने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करीत २४ मेंढ्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतशिवारात पशुधन असणाऱ्या पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. मालपुर येथील अमरधाम शेजारी कृष्‍णा आत्‍माराम पाटील यांच्या शेतात वासधरे (ता साक्री ) येथील मेंढपाळ काल सायंकाळी चारच्या सुमारास चारशे मेंढ्या शिरपूरकडे चराईसाठी घेऊन जात होते. संध्याकाळ झाल्याने ते रात्रभर मुक्कामाला थांबले होते. 

वासधरे (ता. साक्री) येथील पंडित माणिक डोमाळे व बापू बारकु चोरमले यांच्या ४०० मेंढ्या जाळीच्या वाघुर मध्ये कोंडले होते. रात्री एकच्या सुमारास अचानक सात, आठ लांडग्याची टोळी आली. त्यांनी वाघुर तोडून मेंढ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मेंढ्या वाघुर मधुन सैरावैरा बाहेर पडालेत. मेंढपाळ कुटुंब ही जागा झाले. काहीच सुचेनासे त्यांना झाले. वाघूर पासून शंभर दोनशे मीटर अंतरावर सापडले त्या ठिकाणी मेंढ्यांना लांडग्यांनी फस्त करून फडशा पाडला होता. अर्ध्या रात्री पासून हे हल्ला मिशन लांडग्यांच्या टोळीने सुरू ठेवले होते. 

यामुळे मेंढपाळ कुटुंबातील महिला, लहान मुले प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होते. या धुमाकुडीत मेंढपाळ पंडित डोमाळे, बापू चोरमारे यांच्या वरही लांडग्यांनी धाव घेतली होती. असे त्यांनी सांगितले. सकाळी अमरधाम परिसरात व शेतात २० मोठ्या व ४ लहान मेंढ्यांचे लचके तोडलेले ठीक ठिकाणी आढळून आले. त्यामुळे मेंढपाळ कुटुंबातील महिलांना अक्षरशः रडु कोसळले. 


वन्य प्राण्यांच्या हल्लात मेंढ्या ठार झाल्यामुळे शिंदखेडा येथील वनविभागाच्या वनरक्षक जे. आर. भोई यांनी पाहणी करून पंचनामा केला. तर पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. टी. देसले, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश राजभोस, पी. व्ही. चव्हाण यांनी ठार झालेल्या २४ मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com