भुईमुगाला मिळाला कमी भाव..आणि बाजार समितीत ‘दांगडो’

शेतकऱ्यांनी सभापतींना बाजार समितीत बोलावले व समस्या मांडली
Groundnut
GroundnutGroundnut



दोंडाईचा ः दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती ( Dondaicha Agricultural Produce Market Committee) आज गुरुवारी अचानक दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने व्यापाऱ्यांनी मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) माल खरेदीस व्यापाऱ्यांना विरोध दर्शवत दांगडो केला. शेतकऱ्यांच्या भुईमूग (Groundnut) शेंगांना साक्री, शिरपूरप्रमाणे भाव द्या, शेतकऱ्यांना मारू नका, असे बाजार समितीचे सभापती नारायण पाटील (Market Committee Chairman Narayan Patil) यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर शेंगांचा लिलाव सुरू झाला.

(dondaicha agricultural market committee groundnut price low farmer argument)

Groundnut
शोध सुरू होता बिबट्या, अस्वलाचा..आणि दिसला मोर !


दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत २७ मेस गुरुवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे भुईमूग शेंगांची दोन हजार क्‍विंटल आवक होती. यात ओल्या आणि कोरड्या शेंगा होत्या. दोनच्या दरम्यान शेंगांचा लिलाव सुरू झाला. ओल्या शेंगांना बत्तीसशे ते चौतीसशे रुपये प्रतिक्विंटल व कोरड्या शेगांना त्रेपन्नशे ते पंचावनशे रुपये प्रतिक्विंटल दर दोन दिवसांपूर्वी होता. गुरुवारी अचानक दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने व्यापाऱ्यांनी मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांनी माल खरेदीस व्यापाऱ्यांना विरोध दर्शवत दांगडो केला, तेव्हा शेतकऱ्यांनी सभापतींना बाजार समितीत बोलावले व समस्या मांडली. सभापती पाटील यांनी नंदुरबार, धुळे, साक्री, शिरपूर, बाजार समितीत फोन करून शेंगांचे भाव जाणून घेतले असता तेथील भाव जास्त होते, तेव्हा शेतकऱ्यांना शांत करत सभापतींनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

Groundnut
शिक्षकांना कामाच्या मुल्यमापनावर मिळणार वेतन !

दोंडाईचा बाजार समितीचा लौकिक
सभापती पाटील यांनी शेंगा खरेदीदार व्यापाऱ्यांना बोलविले आणि शेतकऱ्यांना शेंगांचे उत्पादन करताना किती खर्च होतो, शेंगतेलाचे दैनंदिन वाढणारे भाव पाहता शेतकऱ्याच्या विक्रीसाठी आलेल्या शेंगांना योग्य भाव द्या, शिरपूर, साक्री, नंदुरबार बाजार समितीत आणि दोंडाईचा बाजार समितीत दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल भाव फरक आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वत्र लौकिक आहे तो टिकवा व शेतकऱ्यांना मारू नका, असे सभापतींनी व्यापाऱ्यांना समजावले आणि शेगांचा बंद पडलेला लिलाव पूर्ववत सुरू करून बाजार समितीत उफाळलेला दांगडो शांत केला.

(dondaicha agricultural market committee groundnut price low farmer argument)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com