एकलव्य शाळांचा टक्‍केवाढीसाठी समिती गठीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य शाळांचा टक्‍का घसरला असल्याचा प्रकार "सकाळ'मध्ये बातमी स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेतांना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्‍तांनी समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत शाळांचा टक्‍का वाढविण्यासाठी उपाययोजना, सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार कार्यप्रणालीतही बदल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल झाल्यानंतर आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या राज्यातील तीन एकलव्य शाळांचा निकाल घसरला असल्याची बाब समोर आली होती. 2018-19 शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमातून आठ एकलव्य शाळांमधून 377 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 6 मेस जाहीर झाला. यात 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 75 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली होती. यात एकलव्यच्या तीन शाळांचा निकाल अतिशय खराब लागला होता. शाळांची निकालातील घसरलेली टक्केवारी मात्र या शाळेच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण त्यामुळे घसरलेला टक्का विभागासाठी चिंतेंची बाब बनली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eklavya school