"विधानसभेत'ही याच निकालाची पुनरावृत्ती : एकनाथराव खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
रावेर व जळगाव लोकसभेच्या मतमोजणी ठिकाणी श्री. खडसे, नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, आमदार संजय सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी आले होते. त्यावेळी श्री. खडसेंशी संपर्क केला असता, बोलत होते. 

श्री. खडसे म्हणाले, की देशाची सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात मोदी सरकारने ठोस पाऊले उचलली. देशाची प्रतिष्ठा इतर देशांमध्ये वाढविली. देशाला एक सक्षम नेतृत्व भाजपचे देऊ शकते, असा विश्‍वास मतदारांमध्ये होता. 18-35 वयोगटातील युवक, युवतींनी भाजपला भरभरून मतदान केले. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या विकासाकडे नेण्याबाबतच्या योजनांचा फायदा निश्‍चित झाला आहे. देशभरात "एनडीए'ला 350 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे झाले आहे. 
गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून अपवाद वगळता जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ भाजपकडे आहेत. आताही ते भाजपकडे राहिले आहेत. ही भाजपच्या विकासात्मक कामाची पावती आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने त्यांना भुईसपाट व्हावे लागले. 

विकासकामांवर मताधिक्‍य 
श्री. खडसे म्हणाले, रक्षा खडसे यांना 3 लाखांवर मताधिक्‍य मिळेल, अशी आशा होतीच. त्याप्रमाणे मते मिळाली. मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर हे मताधिक्‍य मिळाले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknath khadse vidhansabha result