नाशिकमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न; खासदार गोडसेंसाठी धोक्याची घंटा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नाशिकः तीस वर्षांपासून शहरातील शिवसेनेकडे एकमेव असलेली देवळाली विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने पटकाविल्यानंतर शहरातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून, पश्‍चिममध्ये बंडखोरी करताना शिवसैनिकांनी निर्माण केलेली भीती देवळालीच्या पराभवानंतर खरी ठरण्याची शक्‍यता आहे. देवळालीचा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळत असताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठीदेखील तो मोठा धक्का मानला जात असून, त्यांच्या संसरी गावात शिवसेनेला किती मतदान पडले, याची आता आकडेमोड सुरू झाली आहे. 

देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तीस वर्षांपासून ताकद आहे. देवळालीसह भगूर, देवळाली कॅम्प व तालुक्‍याच्या गावागावांत शिवसेना पोचली आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवसेनेने केडरच्या ताकदीवर निवडणूक लढविली. यंदा मात्र शिवसेनेला पराभवामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेचा पराभव फक्त माजी मंत्री बबनराव घोलप किंवा विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्यापुरता मर्यादित नसून सर्वांत मोठा धक्का खासदार यांच्यासाठी मानला जात आहे. खासदार गोडसे मुळचे संसरीचे आहे. संसरीतून घोलप यांना किती मिळाली, याची आकडेमोड सुरू झाली आहे. त्याशिवाय भगूर, देवळाली कॅन्टोन्मेंट व पश्‍चिम पट्ट्यातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पडलेल्या मतदानाची तपासणी सुरू झाली आहे. 
 
प्रचारातून गोडसे गायब 
 घोलप कुटुंबीयांची आतापर्यंतची मदार मराठा मतदानावर होती. परंतु मराठा मतदारांनी यंदा घोलपांना नाकारल्याचे स्पष्ट झाले. खासदार गोडसे यांनी शिवसेनेसाठी काम केले असते, तर मतांचा टक्का वाढला असता. परंतु संपूर्ण निवडणुकीत गोडसे गायब दिसल्याची सल शिवसैनिकांमध्ये आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godse in danger