esakal | अतिक्रमणाविरोधात अजंग ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले कुलूप.
sakal

बोलून बातमी शोधा

live

अतिक्रमणाविरोधात अजंग ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले कुलूप.

sakal_logo
By
प्रमोद सावंत,मालेगाव

मालेगाव :तालुक्यातील अजंग येथील मालेगाव नामपूर रस्त्यावरील वैष्णव नर्सरीच्या मागील बाजूस असलेल्या गावठाणाच्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण करून अनधिकृतरित्या पाया  बांधकाम केले आहे. त्याविरोधात गावातील काही ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत मंगळवारी सकाळी अकराला ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
    ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांचा संप असल्याने अजंग येथील ग्रामसेवक ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन स्विकारण्यास येऊ न शकल्याने ग्रामस्थांनी मालेगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदन सादर केले. विस्तार अधिकारी पवार यांनी स्विकारले.
    या अतिक्रमीत जागेवर घरकुल लाभार्थ्यांची मंजूर घरकुले बांधावीत व कुणीही अनधिकृत प्रवेश करू नये,असा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत करण्यात अाला  काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचे अाढळून अाल्याने ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा व पंचायत समितीकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
      निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दादाजी अहिरे, विनोद शिरोळे,नानाजी सोनवणे, दगडू सूर्यवंशी, गोकूळ सूर्यवंशी,राजेंद्र अहिरे, किरण अहिरे, गोकूळ शेवाळे,तेजस अहिरे आदीच्या सह्या आहेत.

loading image
go to top