परतीच्या पावसाचा काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना फटका, पिंगळवाडेला बाग भुईसपाट

रोशन भामरे :सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

सटाणा- परतीच्या जोरदार पाऊस वादळी वाऱ्याचा बागलाण तालुक्यातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे पिंगळवाडे (ता बागलाण) येथील वेडू जिभाऊ भामरे यांचा काढणीला आलेल्या दोन एकर द्राक्षबागेत संपुर्ण पाणी साचले,चिखल झाल्याने व माती मऊ झाल्याने अँगलचे सिंमेंटचे गड्डे उन्मळून पडल्याने बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 टन द्राक्षाचे नुकसान होऊन लाखोचे नुकसान झाले आहे. 

          पिंगळवाडे येथील भामरे यांनी आपल्या पत्नीच्या नावावरील गट नं.243 मध्ये क्लोन 2 या जातीच्या द्राक्षांची लागवड केली होती.  यंदाच्या मोसमात जून महिन्यात छाटणी केली होती. त्यानंतर सुरुवातीला यंदा  पावसाळा कमी असल्यामुळे  मोठ्या प्रमाणात  द्राक्ष बहरले होते. त्यानंतर जवळपास शंभर दिवसानंतर तयार झालेल्या दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाला असून, त्या बागेसाठी सुरुवातीपासून यंदा चार लाख रुपये खर्च केला आहे.  त्याचबरोबर द्राक्ष उभारणीसाठी लागणारा अँगल व तार यांचे देखील जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे

माझा २ एकर क्लोन- 2 व्हरायटीचा द्राक्षबाग सततच्या मुसळधार पावसामुळे उन्मळून पडला आहे. २० जुनला गोड छाटणी करुन त्यानंतर माञ सततच्या पावसामुळे कसाबसा बाग वाचवण्यात यशस्वी झालो होतो. छाटणीपासुन ते आजपर्यंत  चार लाख रु. मजुरी, खते व औषधांचा खर्च झाला आहे. माञ बाग काढणीवर असतांना सततच्या पावसामुळे संपुर्ण बागेत चिखल झाल्याने व माती मऊ झाल्याने अँगलचे सिंमेंचे गड्डे उन्मळून पडल्याने आजच्या बाजारभावाने २० लाखाचे नुकसान झाले 
     रविंद्र वेडू भामरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी,पिंगळवाडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news graps bag