पुलावरुन ट्रॉला कोसळल्याने चालक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

भुसावळ : जळगावहून भुसावळकडे येणाऱ्या भरधाव वाहनाने नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या ट्रॉलाट्रकला कट मारला. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला पुलावरुन खाली कोसळल्याने एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर दुपारी घडली.

नागपूर येथून मुंबईला लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रॉला क्रमांक (आर.जे. ४७, जी.ए. १३४२) हे अवजड वाहन भुसावळ येथून जळगावच्या दिशेने जात असताना, समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने कट मारला. यावेळी बचावात्मक पवित्रा घेत, ट्रॉला चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला घेताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला थेट पुलाखाली कोसळला. यात चालक राजू गोपाल बहिरवे (वय २३) रा. अजमेर हा जागीच ठार झाला. घटनेचे वृत्त कळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी आपल्या पथकासह धाव घेत पाहणी केली.

अपघात नित्याचेच 
जिल्ह्यातून गेलेले सर्वच महामार्ग खोदून काढण्यात आले आहेत. शिवाय, महामार्गावर खड्डे पडले असल्याने वाहन चालविताना अपघाताचीच अधिक भिती असते. याची प्रचिती महामार्गावर रोजच होणाऱ्या अपघातांनी येत आहे. महामार्गाची झालेली दुरावस्था आणि आणि खोदलेल्या मार्गामुळे अपघात आणि त्यात मृत होण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news highway brige trolla accident driver death