होळीनिमित्त मुंबई, पुण्याहून धावणार पाच गाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

भुसावळ : होळी सण साजरा करण्यासाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावर पाच विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळ : होळी सण साजरा करण्यासाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावर पाच विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०२०४१ लोकमान्य टिळक टर्मिनस पटना विशेष गाडी (२ फेरी) ही गाडी दर गुरुवारी ५ आणि १२ मार्चला लोकमान्य तिलक टर्मिनस येथून सकाळी ५.१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० ला पटना पोहचेल. गाडी क्रमांक ०११०४ अप पटना - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दर शुक्रवारी पटना हून ६ आणि १३ मार्चला रात्री नऊला रवाना होऊन तिसऱ्या दिवसी सकाळी ४. १० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल. मार्गात ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर, मदनमहल, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, अलाहबाद छोइकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा याठिकाणी थांबेल.
गाडी क्रमांक ०१११७ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष गाडी (२ फेरी) डाउन गाडी दर रविवारी ८ आणि १५ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ११. ०५ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहाला वाराणसी पोहचेल.
गाडी क्रमांक ०२०४८ अप वाराणसी - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दर मंगळवारी १० आणि १७ मार्चला वाराणसी येथून सकाळी आठला रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० ला लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर, मदनमहल, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, अलाहबाद छोइकी येथे थांबेल.
गाडी क्रमांक ०२०४३ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - मऊ विशेष गाडी दर शनिवारी ७ आणि १४ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुबह ५.१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० ला मऊ पोहचेल. गाडी क्रमांक ०११२० अप मऊ - लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर रविवारी ८ आणि १५ मार्चला मऊ येथून रात्री ७. २५ ला रवाना होऊन तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी पाचला पोहचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, होशंगाबाद, भोपाल, विदिशा, बिना, सागर, दमोह, कटनी मुरवारा, मैहर, सतना, मानिकपुर, अलाहबाद छोइकी, वाराणसी येथे थांबेल.
गाडी क्रमांक ०११२३ डाउन पुणे - दानापुर विशेष गाडी दर रविवारी पुणेहून ८ आणि १५ मार्चला दुपारी सव्वा चारला रवाना होऊन तिसऱ्या दिवशी रात्री दीडला दानापुर पोहचेल. गाडी क्रमांक ०११२४ अप दानापुर - पुणे गाडी बुधवार आणि मंगळवारी ११ आणि १७ मार्चला दानापुर येथून सकाळी साडे सहला रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ३.४० वाजता पूणे येथे पोहचेल. ही गाडी अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर, मदनमहल, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, अलाहबाद छोइकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा येथे थांबेल.
गाडी क्रमांक ०२०४९ डाउन पुणे - बल्लारशाह ही गाडी ३ ते ३१ मार्च पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून दुपारी साडे पाचला रवाना होऊन दुसऱ्या दिवशी २.२५ वाजता बल्लारशाह पोहचेल. ०१४८० अप बल्लारशाह - पुणे ही गाडी ४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दर बुधवारी को बल्लारशाह येथून सायंकाळी सव्वा सहाला रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी पाचला पुणे पोहचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, नवसारी, भेट, चलथान, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपुर येथे थांबेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news holi special train mumbai pune line busawal news