‘आयटीआय’मधील  वजा गुणपद्धती बंद

मधुकर घायदार
रविवार, 4 मार्च 2018

कनाशी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षेतील वजा गुणपद्धत या वर्षापासून रद्द करण्यात आली आहे.

आयटीआयची परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयानंतर आता शासनाने हा निर्णय घेतला आहे. २०१३ पासून शासकीय, तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत वजा गुणपद्धतीचा अवलंब केला जात होता.

एकास चार अशी वजा गुण पद्धत याचा अर्थ उत्तरपत्रिकेत चार प्रश्‍न चुकले तर एका बरोबर प्रश्‍नाला मिळालेले गुण वजा होत होते. या गुणपद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत असत. विद्यार्थीदेखील गुण कापले जात असल्याने सर्व प्रश्‍नांची उत्तरे लिहीत नसत. याचा थेट परिणाम निकालावर होत होता. विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी वजा गुणपद्धतीचा वारंवार विरोध केला होता. यंदापासून ही गुणपद्धत बंद करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारच्या रोजगार आणि प्रशिक्षण विभागाचे महासंचालक सुनील कुमार गुप्ता यांनी पत्रात नमूद केले आहे. पत्रानुसार याअगोदर छापलेल्या प्रश्‍नपत्रिकेत वजा गुणपद्धत असली तरी ही पद्धत या वर्षातील होणाऱ्या परीक्षेसाठी लागू नसेल. गुण पद्धतीतील या बदलामुळे विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण जास्त मिळण्याची शक्‍यता आहे.

आयटीआय परीक्षेतील वजा गुणपद्धती रद्द झाल्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. परिणामी आयटीआयच्या निकालाच्या टक्केवारीत भर पडणार आहे. वजा गुणपद्धत नसल्याने विद्यार्थी आता सर्व प्रश्‍न सोडवतील आणि एकंदरीत याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे.
- एस. डी. साबळे, प्राचार्य, आयटीआय (मुलींचे), त्र्यंबक नाका, नाशिक

Web Title: marathi news ITI education nashik

टॅग्स