पाण्यासाठी इथल्या 21 गावात आता "जल पे चर्चा' 

jal pe charcha
jal pe charcha

नंदुरबार ः महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणाऱ्या ऍक्वाक्राफ्टच्या सहकार्याने जिल्ह्यातील 21 गावात "जल पे चर्चा' या अभियानाला सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही 2017 मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने विकासासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एमव्हीएसटीएफने राष्ट्रउभारणीच्या या कामासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक-खासगी भागीदारी निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. त्या अंतर्गत या अभियानास नुकताच मुंबईत प्रारंभ झाला. यावेळी नीति आयोगाशी संबधित अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्‍टर आर. रामानन, स्पर्श गंगा अभियानाच्या प्रमुख आरुषी निशंक, आर. डी. नॅशनल कॉलेजच्या आय/सी प्रिन्सिपल डॉ.नेहा जगतानी उपस्थित होत्या. हे अभियान जागतिक जलदिनी मार्चला संपणार आहे. 

जिल्ह्यात काय काम करणार? 
ग्रे वॉटर मॅनेजमेंट व पाणी बचतीच्या इतर उपयांच्या सहाय्याने पाण्याचे नवे स्रोत तयार करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि जलस्रोतांची वाढ या विषयावर या अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एमव्हीएसटीएफ व ऍक्वाक्राफ्ट करत आहे. त्याचबरोबर जल बचतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे. एमव्हीएसटीएफ आणि ऍक्वाक्राफ्टचे हे अभियान महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांतील 98 तालुक्‍यांमध्ये राबवले जाणार आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, धडगांव तालुक्‍यातील 21 गावांचा समावेश आहे. 

युवकांचा सहभाग 
या अंतर्गत जिल्हास्तरावर तरुणांना आवडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यात जलशक्ती अभियान (जेएसए) या घटकाची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो (सीएमआरडीएफ) आणि जिल्हा एक्‍झिक्‍युटिव्ह या विषयावरील त्यांची मते आणि जलशक्ती अभियानाअंतर्गत (जेएसए) करण्यात आलेली कामे, आव्हाने आणि या अभियानाचा काय फायदा झाला या गोष्टी सर्वांसमोर मांडणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवण्यात येणार असून, कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी मुक्त संवादाच्या कार्यक्रमाबरोबरच प्रश्न मंजूषाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या अभियानात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमव्हीएसटीएफच्या वतीने तरुणांना करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com