जळगाव जिल्ह्यात 15 ठिकाणे प्रतिबंधीत...प्रशासनाने केले जाहीर ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

परिसरात संपूर्ण लॉकडाउन राहणार आहे. शिवाय नागरिकांच्या बाहेर पडण्यावर ही निर्बंध घालण्यात आले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहिर केली आहे. 

जळगाव: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थीती अधिकच चिंताजणक होत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रणासाठी आता कोरोना बाधित क्षेत्रात नागरिकांचा वावर बंद करण्यासाठी जिल्ह्यातील 15 ठिकाणे प्रतिबंधीत (कंटेटमेंट झोन) 
क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यात जळगाव शहरातील दोन परिसरांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधित परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून रात्री जाहीर केले आहे. त्यात अमळनेर शहरातील 4 , भुसावळ 5 , पाचोरा 3, अडावद 1 आणि जळगाव शहरातील मारोतीपेठ व समतानगर असे एकूण 2 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या परिसरात संपूर्ण लॉकडाउन राहणार आहे. शिवाय नागरिकांच्या बाहेर पडण्यावर ही निर्बंध घालण्यात आले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहिर केली आहे. 

अमळनेर, भुसावळची परिस्थीती गंभीर 
जिल्ह्यात कोरोनाची बाधीत रुग्णांची संख्या 42 वर गेली आहे. त्यात अमळनेर तसेच भुसवळची संख्या अधिक असून या दोन शहरात परिस्थीती चिंताजणक बनली आहे. त्यानुसार प्रशासनाने अमळनेरचे 4 तर भुसावळचे 5 कोरोना बाधीत परिसर प्रतिबंधीत केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 15 places Contentment zone Jalgaon district.