esakal | जिल्ह्यात 16 मंडळांचीच अधिकृत वीजजोडणी 
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात 16 मंडळांचीच अधिकृत वीजजोडणी 

जिल्ह्यात 16 मंडळांचीच अधिकृत वीजजोडणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मंडळांकडून अनधिकृतपणे विजेचा वापर होतो. हे प्रकार टाळण्यासाठी "महावितरण'कडून यंदा सवलतीच्या दरात वीजपुरवठा देण्याचे नियोजन करत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरी देखील "महावितरण'च्या या हाकेला जिल्हाभरातून केवळ 16 मंडळांनी प्रतिसाद देत अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. काही मंडळांनी घरगुती वीज कनेक्‍शन घेतले असले, तरी बहुतांश मंडळांकडून अनधिकृतपणे वापर करण्यात येत आहे. 
गणेशोत्सवात मंडळांकडून आरास साकारताना आकर्षक लायटिंग, रोषणाई केली जाते. यासाठी आकडे टाकून किंवा अन्य कोणाकडून घेऊन वीज वापरली जाते. परंतु, घरगुती वीजमीटरमधून दहा दिवसांसाठी वीज घेतल्यास ती महाग पडत असल्याने मंडळांना "महावितरण'ने सवलतीच्या दरात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन यंदाही केले आहे. मंडळांनी अर्ज केल्यावर तत्काळ मीटर बसवून कनेक्‍शन जोडून देण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी अनामत रक्‍कम घेऊन कनेक्‍शन जोडले जाते. "महावितरण'च्या या उपक्रमाला जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. 

शहरात जोडली 13 कनेक्‍शन 
गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी देऊन अल्प दरात वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यात जिल्ह्यातून आजपर्यंत केवळ 16 गणेश मंडळांनी वीजजोडणी घेतली आहे. यात शहरातून 15 मंडळांचे अर्ज आले असून यापैकी अनामत रक्‍कम भरणाऱ्या 13 मंडळांना वीज जोडणी करून देण्यात आली आहे. तसेच मुक्‍ताईनगर 1 आणि भुसावळमधून दोन मंडळांना कनेक्‍शन जोडण्यात आले आहे. परंतु पाचोरा, पारोळा, धरणगाव, चाळीसगावसह अन्य तालुक्‍यातून एक देखील मंडळाने अधिकृत कनेक्‍शन जोडणी घेतलेली नाही. 

loading image
go to top