Loksabha 2019 : चार हजार "ईव्हीएम' यंत्रे झाली "सील' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जळगाव ः लोकसभेच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाने साडेतीन हजारांवर मतदान केंद्र निश्‍चित केली आहेत. मतपत्रिकांवर उमेदवारांचे अनुक्रमांक, नाव, फोटो, चिन्ह छापून आल्यानंतर आज सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांवर मतपत्रिका "इव्हीएम' मशिनमध्ये समाविष्ट करण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर एक व पाच टक्के राखीव अशी एकूण सुमारे मतदान यंत्रे आज "सील' करण्यात आली आहेत. 

जळगाव व रावेर मतदारसंघातील प्रत्येक तहसील कार्यालय वा अन्य ठिकाणी यंत्रे "सील' करण्याचे काम दिवसभर सुरू होते. संबंधित मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 22 एप्रिलला मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप होणार आहे. जळगाव विधानसभा क्षेत्रातील "ईव्हीएम' मशिन मू. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलावर यंत्रे "सील' करण्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू होते. नंतर ही यंत्रे "स्ट्रॉंगरुम'मध्ये ठेवण्यात आली आहेत. प्रांताधिकारी वनमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या देखरेखीखाली ही यंत्रे "सील' झाली. 

Web Title: marathi news jalgaon 4 thousand evm machin