आ अब लौट चलें.....

aa ab lout chale
aa ab lout chale

कोरोनामुळे आजकाल जिकडे-तिकडे लोकांचे समूह आपापल्या गावांकडे जाण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत, ही स्थिती भयावह आहे. ज्या काही भावनांचा कल्लोळ या समूहात आहे, तो आपल्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. हा काळ मोठा कठिण आहे, असे असले तरी यापूर्वी देखील अशा कठिण काळातून आपला देश पुन्हा उभा ठाकला आहे. साली आलेल्या जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातील हे गाणं नेमकं तसं नसलं तरी मानवी मनाची तीच घालमेल प्रतिबिंबीत करणारं आहे.

आज आपण जिकडे तिकडे जाणारे लोकांचे समूह बघितले तर त्यात आ अब लौट चले अशी (प्रत्येकाला घराकडे जाण्याची तीव्र ओढ) हीच भावना अधोरेखित होते. ही ओढ का असते ते अगदी मनाला पटेल असं नेमकं सांगतांना गीतकार शैलेंद्र यांनी जो मेसेज दिला आहे, तो अत्यंत प्रभावी आहे. 

सहज है सीधी राह पे चलना 
देख के उलझन बच के निकलना 

या दोन ओळी तर आजच्या या लोकांच्या समूहाने घराकडे निघण्याच्या धाडसाला, त्यांच्या मजबूरीला यथार्थरित्या लागू होतात यात संदेह नसावा. आजच्या काळाची तुलना न करता आपण ती स्थलांतरित होण्याची वा एखाद्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी अथवा आपल्याला आता या वाईट काळातून दूर जायचे आहे अशी जी घालमेल असते ती या गीतातील चित्रीकरणातून दिसून येते. या गाण्याची आठवण आजच्या परिस्थतीने दिली. 

आ अब लौट चलें 
नैन बिछाए, बॉंहें पसारे 
तुझको पुकारे देश तेरा... 

मुकेश यांच्या आवाजातील ही या गाण्याची सुरवातच इतकी अप्रतिम आहे की, ते गाणं पूर्ण बघितल्याशिवाय राहवत नाही. राज यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि तुझको पुकारे देश तेरा हा मुकेश यांच्या आवाजातील आशावाद. न्याहाळला आणि समजून घेतला तर येथेच हा चित्रपट आणि हे गाणं भाव खाऊन जातं हे लक्षात येईल. 
बघा ना.. हा प्रतिभावंत गीतकार काय म्हणतो ते... 

सहज है सीधी राह पे चलना 
देख के उलझन बच के निकलना 
कोई ये चाहे माने न माने 
बहुत है मुश्‍किल गिर के सम्भलना 

कोण बरं नाकारेल हे वास्तव? आणि कोणाला हा अनुभव आला नाही असा? आज तर जगात ऐश्वर्यात लोळणारे देखील हतबल झाल्याचे चित्र आपण बघत आहोत, त्यांना हा संदेश नक्‍कीच अंजन घालेल यात शंका नाही. 

आँख हमारी मंज़िल पर है 
दिल में ख़ुशी की मस्त लहर है 
लाख लुभाएँ महल पराए 
अपना घर फिर अपना घर है 

..आणि या ओळी अगदी सोप्या, समजणाऱ्या.त्यात विशेष उकल करून सांगण्यासारखं काहीच नाही, पण त्या किती अनमोल आहेत आणि आजच्या परिस्थीतीशी मिळत्या जुळत्या आहेत हे सर्वांना पटेल. ...म्हणूनच हे गाणं सारखं रूंजी घालतं ते दु:खही हलकं करतं, दु:खाचं भानही ठेवायला भाग पाडतं आणि संघर्षाला सामोरं जाण्याचं बळ देखील देतं. 

सारं काही भन्नाटच... 
आजा रे.. ही लता दीदींची तान आणि शंकर-जयकिशन यांची मेलडी यांचा सुरेल मेळ या गाण्यात अप्रतिम आहे,क्‍लासिक जे काय म्हणतात ते हेच असा साक्षात्कार हे संगीत ऐकतांना होतो,इतक्‍या उंच पट्टीत सुरेल तान केवळ लतादीदींची..ती तान आहे एवढं म्हणू शकेन. सहसा गाण्याचे एक कडवे आटोपले की जे दरम्यानचे संगीत असते ते वाद्यांचा मेळ जमवून तयार केले जाते, यात वैशिष्ट्य हे आहे की, लतादीदीं ची तान,कोरस आणि मग भन्नाट संगीत असं हे कॉम्बिनेशन आहे. यात यापैकी कोण श्रेष्ठ हा गोड संभ्रम देखील गुदगुल्या करीत राहतो, या सर्वांना सलाम, नमन.कधी कधी वाटतं हे कोरस गाणारे व वाद्य वाजवणाऱ्यांना कडकडून भेटावं, त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. 

मेलडी मेकर्स 
नितीन बोस या छायाचित्रकाराच्या तालमीत तयार झालेल्या राघू कर्माकर यांनी या चित्रपटाचे केलेले दिग्दर्शन इतके अप्रतिम आहे की, तो चित्रपट काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही. 
अभिनयाची नैसर्गिक तालीम घेऊन आलेल्या निळया डोळ्यांच्या राजकपूरने तर राजू च्या भूमिकेत प्राण ओतलेत.  कम्मो झालेली सुंदर,बोलक्‍या डोळयांची अभिनेत्री पद्मिनी कायम लक्षात राहते. या गाण्याच्या वेळी तिचं जिवाच्या आकांताने धावणं आणि नुसता आजा रे या हाकेला साजेसे भाव प्रदर्शित करणे कोणीच विसरू शकत नाही. 
दर्द ज्याने आपल्या कंठात सामावून ठेवला अशा मुकेश नावाच्या दैवी गायकाने शैलेंद्र यांच्या या सुंदर ओळींना केवळ जिवंतच ठेवलं नाही तर अजमरामर करून टाकले.  शैलेंद्र या गीतकाराचे शब्द या परिस्थीतीला लागू पडतात यातच सर्व आलं कोणाला ठाऊक होतं या गीतकाराचा हा संदेश आज लागू पडेल ? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com