esakal | सातासमुद्रापार करणार "समुद्रशास्त्रा'चा अभ्यास 
sakal

बोलून बातमी शोधा

आश्‍लेषा उजागरे

सातासमुद्रापार करणार "समुद्रशास्त्रा'चा अभ्यास 

sakal_logo
By
बापूसाहेब पाटील

जळगाव : शिक्षणाच्या कक्षा जशा रुंदावल्या, तशा विदेशातून जाऊन शिक्षण घेण्याच्या मानसिकतेचीही व्याप्ती वाढली.. भारतातील मुलीही त्यात मागे नाहीत. शहरातील आश्‍लेषा अभय उजागरे या विद्यार्थिनीने अशीच भरारी घेतलीय.. सागरी विज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (मास्टर इन ओशियनॉग्राफी) या अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात तिची निवड झाली असून, ऑस्ट्रेलियातील जेम्स कुक विद्यापीठाने त्यासाठी तिला शिष्यवृत्तीही देऊ केलीय.. 

सागर की गेहराईमें.. 
"सागर की गेहराईमें...' नेमकं काय आहे, याबद्दल जगाला नेहमीच कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. त्यासाठीच सागराच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो. समुद्रशास्त्रात (Oceanography/ Marine Biology) या शाखेत किनारपट्टी, समुद्राच्या शाखा, किनाऱ्यावरील पाण्याची आणि समुद्राच्या खडकांची खोली यांचा अभ्यास या विषयातील विद्यार्थी करतात. या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमात समुद्रात काही तास घालविल्यानंतर नमुने गोळा करणे, सर्वेक्षण करणे, आकडेवारीचे विश्‍लेषण करणे, आदी विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. भारतात हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्यापीठात उपलब्ध नाही. 

अल्प विद्यार्थ्यांची होते निवड 
या विषयासाठी भारतातून बोटांवर मोजण्या इतपत विद्यार्थी या विषयाची माहिती काढतात. समुद्रशास्त्रात करिअर करणाऱ्या तरुणांची अभ्यास करताना मोठी कसोटी लागते. त्यात संशोधनासाठी विद्यार्थ्यांना समुद्राच्या तळापर्यंत जाऊन निरीक्षण करावे लागते. त्यामुळे या विषयात करिअर करण्याचा बहुतांश विद्यार्थी विचारच करत नाहीत. परंतु, जळगाव येथील पक्षीमित्र तथा पर्यावरणप्रेमी अभय उजागरे यांची कनिष्ठ कन्या आश्‍लेषा ही युवती वयाच्या 21व्या वर्षी विदेशात जाऊन "मास्टर ऑफ समुद्रशास्त्र' या अभ्यासक्रमांतर्गत संशोधन करणार आहे. ती सध्या बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत काम करीत आहे. 

जेम्स कुक विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती 
समुद्रशास्त्रात करिअर करण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने आश्‍लेषाने पुण्यातील ऍडवाइज संस्थेमार्फत ऑस्ट्रेलियातील समुद्रशास्त्राचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जेम्स कुक विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. यात आश्‍लेषाने उत्तम गुण मिळवत तिची समुद्रशास्त्र अभ्यासक्रमासाठी निवड झाली. तसेच तिला विद्यापीठाकडून सात लाखांची शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली. आश्‍लेषा पुढील वर्षी 14 फेब्रुवारी 2020 ला ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. 

प्राणीशास्त्रात पदवी 
आश्‍लेषाला पर्यावरणातील जिवांविषयी कुतूहल असल्याने ती लहानपणापासूनच वडिलांसोबत पर्यावरणातील बारकावे जाणून घेत होती. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट टेरेसा विद्यालयातून पूर्ण केले. पुढे मूळजी जेठा महाविद्यालयातून प्राणिशास्त्र या विषयातून तिने पदवी घेतली. 

loading image
go to top