esakal | जळगाव ते मुंबई विमान सेवा दुसऱ्यांदा सूरू 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

जळगाव ते मुंबई विमान सेवा दुसऱ्यांदा सूरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जळगाव जिल्हयाचा चौफर विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. जिल्हयाचा विकास विमानसेवेशिवाय अपूर्ण आहे. यामुळे आता नव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'उडान' अभियानातंर्गत आजपासून जळगाव ते मुंबई व अहमदाबाद ते जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच जळगाव ते पुणे अशी विमान सेवा सुरू होईल. रात्रीची सेवा देखील सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आज खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे दिली. 

ट्रुजेट तर्फे आजपासून ही विमान सेवा सुरू झाली. गेल्या वर्षी ऑक्‍टोंबरमध्ये जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा सुरू झाली होती. मात्र मुंबईत स्लॉट न मिळाल्याने ही सेवा अधूनमधून सूरू होती. गेल्या आठ महिन्यापासून ही सेवा बंदच होती. दरम्यान डेक्कन विमान कंपनीने सेवा सूरू न केल्याने त्या कंपनीचा करार संपूष्ठात आणून आता ट्रजेट कंपनीला विमानसेवेच कंत्राट देण्यात आले. 

अखेर तब्बल दुसऱ्यांदा जळगाव विमानतळावरून जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा आजपासून सूरू झाली. खासदार उन्मेष पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून विमान सेवेचे उदघाटन केले. आमदार चंदूलाल पटेल, विमान प्राधिकरण सल्लागार समितीचे सदस्य भरत अमळकर, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते. 
 

loading image
go to top