धक्कादायक...अजून जिल्ह्यात सात कोरोना बाधित रूग्ण आढळले ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 244 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून चिंताजणक बाब आहे. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह तर सकाळी आलेले आलेले दोन असे आज नऊ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे. 

जिल्ह्यासोबत जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलेली असून ही चिंताजणक गोष्ट आहे. त्यात सकाळी दोन जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असून एक गांधी नगर दुसरा जोशी पेठ येथील आहे. तर आता काही वेळापूर्वी आलेल्या अहवालात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यात जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, भुसावळ येथील दोन, भडगाव येथील एक व खामगाव, जि. बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 244 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

सिंधी कॉलनी, जोशी पेठ हॉट स्पॉट 
शहरातील सर्व परिसरात आता "कोरोना' पसरत असून दाट वस्तीसह आता उच्चभ्रु वस्तीत देखील कोरोनाचा 
शिरकाव केला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा पन्नासचा आकडा झाला असून मयत चार जण असून कोरोनातून बरे झालेले 6 जण आहे. त्यात पाच सिंधी कॉलनी, पाच जोशी पेठ येथील रुग्ण असल्याने सिंधी कॉलनी, जोशी पेठ हे हॉट स्पॉट झाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon again sevan corona patient report positive