कृषीशी संबंधित यंत्रसामग्रीची दुकाने सुरू करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कृषी क्षेत्राची संबंधित यंत्रसामग्रीची दुकाने, स्पेटर पार्टची दुकाने, महामार्गावरील गॅरेज सुरू करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. 

जळगाव : कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 23 मार्चपासून सर्वत्र "लॉकडाउन' आहे. यात अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आले होते. आता मात्र कृषी क्षेत्राची संबंधित यंत्रसामग्रीची दुकाने, स्पेटर पार्टची दुकाने, महामार्गावरील गॅरेज सुरू करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. 

नक्‍की पहा - तक्रारीसाठी पालिकेकडून टेलिग्राम क्रमांक

ट्रक व मालवाहू वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने, गॅरेज, चहा लागवड, उद्योगांशी संबंधित दुकाने, कार्यालये सुरू करण्याचे आदेशही आहेत. या दुकाने, कार्यालयांत केवळ पन्नास टक्के कर्मचारी ठेवावेत, "कोरोना'बाबत योग्य ती काळजी घेऊन कार्य करण्याच्या सूचना आहेत. सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क लावणे, हात धुण्यासाठी सॅनिटायझरची सोय करणे, एका ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याविषयी आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon agree culture Machinery shop open dissision