ऑलआऊट ऑपरेशमध्ये 48 हजारांचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली. 

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली. 

जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री एकाचवेळी 12 ते 3 या वेळेत ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले. कारवाईसाठी पोलिस अधीक्षक ते शिपाई असे एकूण 47 अधिकारी व 452 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा एकाच वेळी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला होता. नाकाबंदी व कोम्बिंग अशा दोन विभागात हे ऑपरेशन राबविण्यात आले. या नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात एकूण 243 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्याव्दारे 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत सलग कारवाई सुरू होती. 

शहरातील नेरी नाक्‍याजवळील स्मशानभूमी परिसरात असोदा मटण हॉटेलच्या मागे झिपरु अण्णा नगरात जुगार खेळणारे विकास भागीरथ पाटील (रा. शिवाजीनगर), फिरोज गुलाब पटेल (रा. मेहरुण), राकेश गवळी (रा. राममंदिराचे मागे), किरण झोपे (रा. जुने जळगाव), कबीर शेख (रा. बळिराम पेठ), राकेश सपकाळे (रा. शिवाजीनगर), अनिल परतुरे (रा. कोळी पेठ), दिनेश मराठे (रा. शिवाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिपेठ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. संजय शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून तपास पोलिस उपनिरीक्षक खेमराज परदेशी तपास करीत आहेत. 

जिल्हापेठ पथकाची धाड 
जिल्हापेठ पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी कारवाई करीत गुजराल पेट्रोलपंपाजवळील हॉटेल राजमुद्रा समोरून दोन जणांना सट्टा खेळताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 400 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. शंभू दिलीप भोसले, विनोद हिरालाल महाजन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
एमआयडीसी पोलिस स्थानकाच्या पथकाने हवे असलेले आरोपी रोहित इंद्रकुमार मंधवाणी (रा. सिंधी कॉलनी), सुनील वना कोल्हे (रा. जानकी नगर), राजाराम सीताराम गायकवाड (रा. भिलाटी, तांबापुरा), दीपक प्रल्हाद बिऱ्हाडे (रा. आंबेडकरनगर, असोदा) विकास हनुमंत पठारे (रा. रामनगर, मेहरुण), सागर शालीक भालेराव, (रा. शिरसोली नाका), मोहम्मद इम्रान शेख रशीद (रा. तांबापुरा), जाहीर शेख अन्सारोद्दीन (रा. मलिकनगर), संदीप नाना सोनवणे, शंकर भगवान गरुड दोन्ही (रा. सिद्धार्थनगर, तांबापुरा) अशी अजामीनपात्र वारंटातील आरोपींची नावे आहेत. आसिफ जुम्मा पिंजारी (पिंजारी वाडा, मेहरुण) हा अयोध्या नगरातील अयोध्या किरणाजवळ हातात धारदार सुरा घेऊन आरडाओरड करीत होता. त्यास ताब्यात घेण्यात आले. रमजान कलीम पटेल (पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) हा मेहरुण भागातील महाजन नगरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने मिळून आला. तर चोरी करताना शोएब शेख अजीज (इस्लामपुरा) आरिफ शेख खैरुद्दीन (उर्दूशाळेजवळ दोन्ही रा.नशिराबाद) पथकाच्या हाती लागले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, विशाल वाठारे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील, असीम तडवी यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon allout opretion 48 thausand