जळगाव जिल्ह्यात आणखी एक "कोरोना'बाधित; "त्या' मृताचा अहवाल "पॉझिटिव्ह'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 एप्रिल 2020

जळगाव : अमळनेर येथील 73 वर्षीय वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 
अमळनेर येथील रहिवासी असलेला हा रुग्ण सोमवारी (ता. 20) दाखल झाला होता. दाखल करतानाच त्याची परिस्थिती अत्यवस्थ होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना 3 ते 4 वर्षांपासून टी.बी. असल्याची माहिती समोर आली आहे. झामी चौकापासून काही अंतरावर असलेल्या आम्लेश्‍वरनगरातील हा रुग्ण असून, त्यांच्या घराचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, तसेच या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 रुग्णांवर कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील मेहरुण, सालारनगर येथील एक, अमळनेर शहरात 3, मुंगसे गावातील एक अशा सहा रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, यापूर्वी अमळनेर येथील झामी चौकातील एका दांपत्याचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले होते. यातील पॉझिटिव्ह महिलेचा अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दांपत्याच्या संपर्कात आलेले त्याच्या कुटुंबीयांसह एकूण 11 जणांना बुधवारी शहरातील शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंटाईन करण्यात आले आहे; तर अमळनेर शहरातील रुग्ण दांपत्य राहत असलेला परिसर "कॉन्टेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अमळनेर शहर लॉकडाउन करीत ते दांपत्य राहत असलेला संपूर्ण परिसर रात्रीच सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची तपासणी देखील केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरीच राहून आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Another "corona" infected in Jalgaon district