शस्त्र, दुचाकीसह दोन संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

जळगाव : शहरात कोंबडीबाजार परिसरात गस्त घालत असतांना जिल्हापेठ पोलिसांनी दोन संशयित मिळून आले. त्यांची चौकशी केली असता, त्याच्यांकडे 4 इंच, 18 इंच लांबी 200 रुपये किमतीची धारदार शस्त्र तसेच दुचाकी मिळून आले आहे. रजीनकांत कवरलाल जैन (वय 36) , गोविंदा नाना वाघ (वय 26 दोघे रा. डी.एस.लॉन्स जवळ प्लॉट नं 14, गट नं 192 यश नगर पिंप्राळा) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांनी नावे आहेत. 

हेपण पहा - शिक्षेमुळे ठेवीदारांच्या रकमा व्याजासह परत

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित सचिन भदाणे व गोविंदा वाघ याच्या दोघांच्या शोधार्थ जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार, अविनाश देवरे, अकबर तडवी हे कर्मचारी 14 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कोंबडी बाजारा पसिरात गस्त घालत होते.

क्‍लिक करा -कॅडबरीपेक्षाही कांदा विकावा लागतो मातीमोल 

यादरम्यान पंकज ऑटो समोर सुभाष कुलरचे दुकानाजवळ कर्मचाऱ्यांना दोन जण संशयितरित्या फिरतांना मिळून आले. त्यातील रजनीकांत कवरलाल जैन हा पाठीमागे काहीतरी लपवित असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी झडती घेतली. त्याची अंगझडतीत घेतली असता, गुप्तीसारखे हत्यार मिळून आले. गुप्ती तसेच दुचाकीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अविनाश देवरे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Arms and two wheelers boys police arrested