"एटीएम' पळवून नेण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील पगारिया ऑटो शेजारील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा थरारक प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. चोरट्यांनी एटीएम यंत्राच्या वायरिंग कापल्यावर "एचडीएफसी'च्या मुंबईस्थित कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून घटना कळवली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने चोरट्यांनी पळ काढला.

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील "एचडीएफसी' बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्यासाठी पाच ते सहा संशयित पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारने आले होते. गॅस कटरसह अन्य साहित्य त्यांच्याजवळ होते. एटीएम मशिनच्या केबिनमध्ये शिरल्यानंतर चोरट्यांनी एटीएमची केबल कटरने तोडून नंतर मशिन पळविण्याच्या प्रयत्न केला. 

मुंबईतील कार्यालयात वाजला अलार्म 
चोरटे मशिन पळविण्याच्या प्रयत्नात असतानाच इंटरनेटद्वारे एचडीएफसी बॅंकेच्या मुंबईस्थित मुख्य कार्यालयात तत्काळ त्याचा अलार्म वाजला. अधिकाऱ्यांनी अलार्म ऐकताच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. गस्तीवरील उपनिरीक्षक संदीप पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; परंतु पोलिस येत असल्याची चोरट्यांना चाहूल लागताच चोरटे कारमध्ये बसून पसार झाले. 

"सीसीटीव्ही'त चोरटे कैद 
संशयित दहा मिनिटे एटीएम मशीनजवळ होते. हा प्रकार फुटेजमध्ये कैद झाला असून, फुटेजनुसार रात्री 01. 20 मिनिटांनी पांढऱ्या कार "एटीएम'च्या बाहेर थांबली. रेनकोट घातलेल्या व्यक्तीने प्रवेश केला. यानंतर तो बाहेर आला. तोंडाला रुमाल बांधलेला दुसरा साथीदार 1.31 वाजेच्या सुमारास कटरने कुठली तरी केबल तोडताना दिसतोय. तर दोन साथीदार "एटीएम' बाहेर उभे दिसत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ATM chori cctv