घरातच पुस्तके वाचून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा; उत्सव समितीचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

कोरोना' व्हायरस रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त स्टेशन चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी घेण्यात येणारी अभिवादन सभा व सायंकाळी काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. वाजत, गाजत मिरवणुका काढून तसेच ठिकठिकाणी अभिवादन सभांचे आयोजन करून जयंती साजरी केली जाते. यंदा मात्र कोरोना व्हायरसमुळे हा उत्साह विरला असल्याने बाबासाहेबांची जयंती घरातच पुस्तके वाचून साजरी करण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. 

"कोरोना' व्हायरस रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त स्टेशन चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी घेण्यात येणारी अभिवादन सभा व सायंकाळी काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. जनतेनेते घरीच पुस्तके वाचून जयंती साजरी करावी असे अवाहन डॉ.आबेंडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे महानगराध्यक्ष मुंकूद सपकाळे यांनी केले आहे. 
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कि "कोरोना'विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असून यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवणे आवश्‍यक आहे. प्रत्येक वर्षी डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव महानगरात हजारो नागरिक एकत्र येत मिरवणूकीत सहभागी होतात. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र या वर्षी "कोरोना'बचावासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून सुरक्षित अंतर ठेवून त्यातून प्रत्येकाचे जिवीताचे रक्षण व्हावे हा प्रमुख उद्येश आहे. त्यामुळे जनतेने अत्यंत साधेपणाने जयंती करावी. 

असे करा बाबासाहेबांना अभिवादन 
प्रत्येकाने कायदेशीर घोषित झालेल्या लॉकडाऊन लक्षता घेवून आपआपल्या घरीच वंदना घेवून पुस्तकाचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव घरतीच साजरा करावयाचा आहे. असे अवाहनही सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे महानगराध्यक्ष मुंकूद सपकाळे, भारत ससाणे, डॉ.प्रकाश कांबळे, दिलीप सपकाळे,अमोल कोल्हे, प्रा.प्रितीलाल पवार, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, राजू मोरे, संजय सपकाळे, बाबूराव वाघ, पिंटू सपकाळे, नाना मगरे आदीनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon babasaheb aambedkar jayanti day read book