बहिणाईंची महती पोचणार 24 भाषांमध्ये 

शिवाजी जाधव
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव ः साहित्य अकादमीच्या "भारतीय साहित्याचे निर्माते' या प्रकल्पांतर्गत जळगाव येथील प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे लिखित "बहिणाबाई चौधरी' या पुस्तकाचा लवकरच 24 भाषांत अनुवाद होणार असून, या माध्यमातून बहिणाईंची महती साहित्य अकादमीकडून देशभरातील विविध भाषासाहित्यात पोचणार आहे. 

जळगाव ः साहित्य अकादमीच्या "भारतीय साहित्याचे निर्माते' या प्रकल्पांतर्गत जळगाव येथील प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे लिखित "बहिणाबाई चौधरी' या पुस्तकाचा लवकरच 24 भाषांत अनुवाद होणार असून, या माध्यमातून बहिणाईंची महती साहित्य अकादमीकडून देशभरातील विविध भाषासाहित्यात पोचणार आहे. 

या पुस्तकाबद्दल प्रा. सपकाळे म्हणाले, की आत्मनिष्ठ स्वानुभवातून निर्माण झालेल्या बहिणाईंच्या काव्याची अनुभूती वाचकांच्या अनुभूतीला जाऊन भिडते, तशी मलाही भिडली. मग बहिणाईबरोबर मी खानदेशी बोलीतच संवाद करू लागला. त्यातून बहिणाबाईंच्या जीवनक्रमाचा व काव्यनिर्मिती प्रक्रियेचा आलेख तयार होऊ लागला. निवेदक म्हणून माझ्याच व्यक्तिमत्त्वातून बहिणाबाईंच्या जावेची योजना झाली. ती बहिणाबाईंसारखेच अनुभव घेणारी सखी सोबतीण झाली. चारचौघींसारखी असूनही बहिणाबाईमध्ये अद्‌भुत क्षमता आहे, त्यामुळे ती वेगळी आहे. इतरांना दिसते, ऐकू येते, त्यापलीकडचे तिला दिसते, ऐकू येते. या जिज्ञासेतून, कुतुहलातून ती बहिणाबाईचे अनुभव, जी ती स्वतःही तेच घेत असते. त्यांचे रूपांतर- अवस्थांतर गाण्यामध्ये, शब्दांमध्ये, ओव्यांमध्ये होताना पाहते, अनुभवते, असा हा काव्यनिर्मिती प्रक्रियेचा सोहळा मी खानदेशी बोलीतच संपूर्ण निवेदन- संवादातून शब्दबद्ध केला. ती "खोप्यामधी खोपा' ही कादंबरी आकारास आली. 
 

"खोप्यामधी खोपा' या माझ्या या कादंबरीमुळे "भारतीय साहित्याचे निर्माते' या प्रकल्पांतर्गत समग्र बहिणाबाई साकारण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मराठी भाषेतील हे पुस्तक साहित्य अकादमीने प्रकाशित केले. आता ते देशातील 24 भाषांमधून बहिणाईंच्या काव्याचा महिमा गाणार आहे. 
- प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon bahinabai 24 language