Video कृउबात येणाऱ्यांवर प्रवेशद्वारातच सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

भाज्या आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आडत बाजारात जास्त गर्दी होवू नये याची काळजी घेण्यात येत आहे. बाजाराच्या आवारात फवारणी करण्यात येत असून स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाला विक्री साठी येणारे शेतकरी बांधव, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या साठी मुख्य प्रवेशद्वारावरच फवारणीद्वारे निर्जंतुक करण्यात येत आहे. भाज्या आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आडत बाजारात जास्त गर्दी होवू नये याची काळजी घेण्यात येत आहे. बाजाराच्या आवारात फवारणी करण्यात येत असून स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

सोशल डिस्टन्सिंगसाठी पांढरे पट्टे 
कोरोना विषाणुचा संसर्गापासून काळजी घेण्यासाठी सर्वच ठिकाणी उपाय योजना केल्या जात आहेत. गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये या करीता बाजार समिती, आडते व व्यापाऱ्यांमध्ये अंतरही पाळले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गर्दी होऊ नये यासाठी वर्तुळ, चौकोन आखून सोशल डिस्टनसिंग केल जात आहे. कामगारांसाठी आणि ग्राहकांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तोंडाला मास्क बांधुनच आत प्रवेश दिला जात आहे. 

शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी 
रब्बी हंगाम संपल्याने आता येथील बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून शेतमालाची आवक वाढू लागली आहे. गहू, हरभरा, मका मोठ्या प्रमाणात येत आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज भासू लागल्यामुळे शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकरी या आडत बाजारात येत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणुने सर्वत्र हाहाकार घातला आहे. शासनाच्या सूचनेवरून सर्वत्र क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. 

"मास्क' चा वापर वाढला 
"कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला तोंडाला रुमाल व "मास्क' बांधुनच कृउबात प्रवेश दिला जात आहे. जळगावात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्ण सापडून आल्याने नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी आपली स्वतःची काळजीही घेतली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bajar samitee market corona social distnci sanetizer