motivation : बापट आजींची 85 वर्षांचे खणखणीत 'गजानन विजय ग्रंथाचे बोल'

अमोल भट
सोमवार, 16 मार्च 2020

ताई बापट यांना संत गजानन महाराजांच्या कृपादृष्टीची अनुभूती १९६७ लाभली, १९७३ रोजी शेगाव संस्थानात झालेल्या पारायण सोहळ्यापासून पासून  महाराजांच्या ग्रंथाचे मुखोद्गत पारायणास प्रारंभ केला.

जळगाव ः 'जिवे भावे शिवसेवा' ही विदर्भ पंढरी असलेल्या शेगाव येथील  संत गजानन महाराजांची शिकवण आहे. याच शिकवणीस अनुसरून शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्तांना मदत उपलब्ध  करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संतश्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ मुखोदगत असलेल्या नाशिक येथील सुमती उपाख्य ताई बापटांचा गेल्या ४७  वर्षांपासून सुरु आहे

ताई बापट यांना संत गजानन महाराजांच्या कृपादृष्टीची अनुभूती १९६७ लाभली, १९७३ रोजी शेगाव संस्थानात झालेल्या पारायण सोहळ्यापासून पासून  महाराजांच्या ग्रंथाचे मुखोद्गत पारायणास प्रारंभ केला. त्यांच्या या वैशिष्ट्यांची ख्याती पसरताच, त्यांना सर्वदूर श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणासाठी आमंत्रीत करण्यात येऊ लागले,दरम्यान मुखोद्गत पारायणाचे  मानधन देखील मिळू लागले. हे मानधन त्यांनी स्वत:साठी न वापरता इतरांसाठी खर्च केले, दरम्यानच्या काळातील अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने, मानधनातील रक्कम आता संकटग्रस्तांना देण्याचा संकल्पच न करता  त्याची प्रत्यक्षात कृतीद्वारे दुष्काळी झळ बसलेल्या विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांना  मदत उपलब्ध करून देत मानवसेवेचे व्रत जोपासले.

अनेकांना मिळाली कार्यप्रेरणा :
ताईंच्या मुखोद्गत पारायणाचे  कार्यक्रम  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये संपन्न झालेत , महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, मुंबई, अहमदनगर, जळगाव खान्देश आणि विदर्भातील शेगाव, अकोला, खामगाव, मलकापूर येथील भाविकांकडून मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ताई सांगतात. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत अनेक भाविकांनी सामाजिक भान जोपासत गरजुंना मदत उपलब्ध करून दिली आहे

कमाईतला काही वाटा समाजासाठी राखून ठेवावा, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण ताईबापट आपल्या कृतीद्वारे सार्थ ठरवत आहेत, ताईंना श्री गजानन विजय ग्रंथाचे सगळेच्या सगळे 21 अध्याय, 3669 ओव्यांसकट आजही वयाच्या ८५ व्या वर्षी देखील मुखोद्गत आहेत. १९६७ मध्ये शेजारच्यांकडून आणलेला ग्रंथ त्यांनी वाचला  त्यानंतर ती विकत घेऊन अखंड पारायण करायला सुरुवात केली अहमदाबाद, दिल्ली, बडोदा आदी शहरांत महाराजांचे विचारकार्य  पोहोचवण्यासाठी त्यांनी भ्रमण केले, हे करताना मिळणारं मानधन त्यांनी समाजकार्यासाठी खर्ची घातलं. मिळालेल्या मानधनातून अनेकांच्या मुलांचे शिक्षण केले, काहींचे व्यवसाय उभे करून दिले तर अनेक गावांना पाण्याच्या टाक्या बांधून देत गरीब मुलींचे लग्न देखील लावून दिले, अनेक ठिकाणी होणाऱ्या सत्कारातील शाली, साड्या त्या स्वतःसाठी कधीही वापरत नाहीत. देवाच्या कृपेने मला सगळं मिळालंय. महाराजांनी दिलेला पैसा हा माझा नसून समाजाचा आहे. त्यासाठीच तो वापरला पाहिजे, असं त्या मानतात.त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयाने त्या केवळ धार्मिकतेतच नव्हे तर सामाजिक क्षेत्राबाबतही पुढे असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bapat Bapat grandmother Gajanan speaks of Vijay Granth '