प्लास्टिक विक्रेत्यांवर मोठी कारवाई; दोन हजार किलो प्लास्टिक जप्त !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पुन्हा शहरात प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा आजपासून प्लास्टिक विरोधी मोहीम आरोग्य विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते, सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली.

जळगाव : प्लास्टिकवर बंदी असतानाही शहरात खुलेआम व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज फुले मार्केटमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे दोन हजार किलो प्लास्टिक पिशव्या व इतर वस्तू महापालिकेच्या आरोग्य विभागाने जप्त केल्या. 

प्लास्टिक बंदी कायदा झाल्यावर शहरात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही कारवाई थांबली. आता पुन्हा शहरात प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा आजपासून प्लास्टिक विरोधी मोहीम आरोग्य विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते, सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. त्यात सायंकाळी चारला सेंट्रल फुले मार्केट येथे न्यू शिवम प्लास्टिकचे सुरेशभाई यांच्याकडे 350 प्लास्टिक आढळून आले असून, त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान, आरोग्य निरीक्षक कांबळे, आरोग्य निरीक्षक किरंगे, अतिक्रमण निर्मूलनचे साजिद अली सतीश ठाकरे, नाना कोळी, संजय पाटील, संजय परदेशी, किशोर सोनवणे, अनिल सोनवणे, रामसिंग सोनवणे उपस्थित होते. 

एकाच दुकानात दीड हजार किलो प्लास्टिक 
फुले मार्केटमधील गाळा क्रमांक 112 एस. एस. डी. मार्केटिंग या 
दुकानातून सुमारे दीड हजार किलो प्लास्टिक पिशव्या व विविध वस्तू जप्त केल्या. सुमारे दोन ट्रॅक्‍टर गोण्या या गोदामातून रात्री उशिरापर्यंत जप्त करण्यात आल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Big action on plastic dealer;Two thousand kilos of plastic seized!s