भाजपच्या महापौर पतीची दबंगगिरी...उपायुक्त पोहचले पोलिसात ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

जळगाव ः शहरातील दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. परंतु महिन्यापासून मक्तेदाराने काम बंद केल्याने शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यात मंगळवारी टी. बी. रुग्णालय येथे सकाळी मक्तेदाराची बाजू का घेतात या कारणावरून महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा महापालिका अधिकाऱ्यांशी शाब्दीक वाद झाला होता. यावेळी महापौर पती कैलास सोनवणेंकडून उपायुक्तांना शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

शहर स्वच्छतेसाठी महापालिकेची पर्यायी यंत्रणा तीन दिवसापासून सुरू होते. त्यात सोमवारी रात्री उशिरा "वॉटरग्रेस' कडून काम सुरू करण्याचा तयारी दर्शविला होती. याबाबत उपायुक्तांनी आयुक्तांशी चर्चा 
करून कर्मचाऱ्यांना व्हॉटसऍपवर मेसेज पाठवून सकाळी उपस्थित राहण्यास सांगीतले होते. टि. बी. रुग्णालय येथे पहाटेपासून कर्मचारी येऊन थांबलेले होते. त्यात महापौरांसह अन्य पदाधिकारी नगरसेवक कैलास सोनवणे यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेच्या मक्तेदारावरून महापालिका उपायुक्त मिनीनाथ 
दंडवते यांच्यासोबत शाब्दीक वाद झाला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपायुक्त दंडवतेंना शिवीगाळ व धमकाविले अशी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार उपायुक्तांनी केली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp Mayor's husband File a complaint at the police station