रसायन टाकून पिकविलेल्या आंब्यांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी केली असता प्रथमदर्शनी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. विक्रेत्याकडून आंब्यांचे नमुने घेतले असून ते जिल्हा प्रयोग शाळेत पाठविले आहे. 

जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी केली असता प्रथमदर्शनी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. विक्रेत्याकडून आंब्यांचे नमुने घेतले असून ते जिल्हा प्रयोग शाळेत पाठविले आहे. 
गोलाणी मार्केटमध्ये आज सकाळी आंबे विक्रेत्यांकडील आंब्यांची तपासणी झाल्याने आंबे विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सद्या बाजारपेठेत आंब्यांना मोठी मागणी असून केसर, राजापुरी, कलमी, लंगडा, बदाम, हापूस, तोतापुरी, हैद्राबादी हापूस अशा विविध प्रकारातील आंब्यांना मोठी मागणी आहे. 
परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या आरोग्यास घातक असलेल्या रसायनाचा वापर करून पिकवले जात आहेत. याबाबत नागरिकांच्या महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत आज आरोग्याधिकारी उदय पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी सुनील पांडे, आरोग्य निरीक्षक संजय अत्तरदे, अशोक नेमाडे, शरद बडगुजर, आर. डी. पाटील यांच्यासह पथकाने गोलाणी संकुलातील तळमजल्यातील आंबे विक्रेत्यांकडे जाऊन तपासणी केली. तसेच प्रथमदर्शीनीतून रसायन टाकून पिकविलेल्या आंब्याचे नमुने ते घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविले आहेत. 

शहराबाहेर आंबे पिकविण्याचे गोदाम 
शहरात ठिकठिकाणी आंबे विक्रेत्यांनी दुकान थाटले आहे. रसायनाचा वापर करून आंबे विक्री होत आहे. मात्र कारवाईच्या भीतीने शहराबाहेर किंवा बाजार समितीसारख्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात आंबे आणले जातात तिथे रसायन टाकून आंबे पिकविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांसोबत शहराबाहेरील व फळबाजार समिती ठिकाणी देखील कारवाईची मोहीम तीव्र करणार असल्याचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी सांगितले. 

कॅल्शिअम कार्बाईड आरोग्यास हानिकारक 
आंबे पिकविण्यासाठी विक्रेत्यांकडून कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यानुसार पथकाने केलेल्या पाहणीतून प्रथमदर्शनी दिसून आले आहे. हे रसायनामुळे विविध आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने आरोग्यास धोकादायक हे रसायन असून योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिले आहे. 

आंबे विक्रेत्यांमध्ये खळबळ 
महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अन्न-औषध प्रशासन विभागातर्फे आंबे विक्रेत्यांवर आज कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सकाळी गोलाणी व्यापारी संकुलाच्या तळघरातील सर्व आंबे विक्रेत्यांकडील आंब्यांची महापालिकेच्या पथकाने जाऊन तपासणी केली. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon camical mango cheaking