जळगावात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 53 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

 

जळगाव ः कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 37 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असून आज प्राप्त झालेल्या अहवालातून आणखी एक पॉझिटीव्ह आढळून आला. पॉझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या समतानगरातील महिलेचे वडील आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील अकरा व्यक्तींचा समावेश आहे. आजच्या पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 53 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city corona positive case again