सी.एस.'-"डीन'च्या वादातून जिल्ह्यात विस्तारला "कोरोना' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

कोरोना'चा "पॉझिटिव्ह' रुग्ण सोडण्यावरूनही दोघांमध्ये वाद झाला. एक म्हणे दुपारी तीनला सोडणार, दुसरा म्हणे सायंकाळी पाचला सोडणार. सर्वांत पहिला रुग्ण "पॉझिटिव्ह' निघाला याची माहिती "सिव्हिल'मधूनच बाहेरच्या लोकांना कळाली.

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'ची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. "कोरोना'ला रोखण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्याची गरज असताना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अर्थात "कोविड केअर सेंटर'चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्यात रुग्णांची माहिती कोण आधी देतो, त्यात माझेच नाव कसे येईल यावरून जुपली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हस्तक्षेप करून लक्ष देणे गरजेचे आहे. 

हेपण वाचा - धुळ्यात चौफेर पसरतोय "कोरोना'`

शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. खैरे यांचे खरे काम "कोरोना' रुग्णसंख्या वाढणार नाही, त्यासाठी काय- काय उपाययोजना करता येईल, गर्दीच्या ठिकाणी काय उपाय केले पाहिजेत आणि संबंधित उपायांची अंमलबजावणीसाठी पोलिस, प्रशासन यांना सूचित करणे. मात्र तसे न होता "कोरोना' रुग्ण किती वाढले, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कोण अगोदर देतो यासाठी प्रयत्न केले जातात. 
"कोरोना'चा "पॉझिटिव्ह' रुग्ण सोडण्यावरूनही दोघांमध्ये वाद झाला. एक म्हणे दुपारी तीनला सोडणार, दुसरा म्हणे सायंकाळी पाचला सोडणार. सर्वांत पहिला रुग्ण "पॉझिटिव्ह' निघाला याची माहिती "सिव्हिल'मधूनच बाहेरच्या लोकांना कळाली. यामुळे रुग्णाचे नाव फोटोसह प्रसिद्ध झाले. "कोरोना' रुग्णाबाबत नाव न देण्याचे नियम त्यांनी पाळले नाहीत. आतातर "कोरोना' रुग्णाची माहिती आपले नाव प्रसिद्ध होत नसल्याने लवकर दिलीही जात नाही. दिली तरी रुग्णाचा पत्ता दिला जात नाही. शल्यचिकित्सकांना माहिती विचारली तर किती रुग्ण "पॉझिटिव्ह' आले याची माहिती ज्यांनी दिली त्यांना विचारा, अशी उत्तरे दिली जातात हे चुकीचे आहे. "पॉझिटिव्ह' रुग्ण ज्या भागात सापडतो तेथील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, अशा उद्देशाने माहिती छापली जाते. मात्र, "कोविड केअर सेंटर'मधील अधिकारी आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. त्यामुळे जिल्ह्यातून "कोरोना' हद्दपार होण्यासाठी या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी योग्य ते आदेश देतील, अशी अपेक्षा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital and medical collage crashes