कोरोना संशयीत तरुणीने स्वॅब घेण्यापूर्वी ठोकली धूम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

तरुणीवर उपचार सुरु असतांनाच आज सकाळच्या सुमारास ही तरुणी रुग्णालयातील कोरोना वार्डातून पसार झाल्याने वैद्यकीय यंत्रणेमध्ये खळबळ माजून गेली आहे. दरम्यान संपूर्ण यंत्रेणेने महाविद्यालयाच्या परिसरात या तरुणीचा शोध घेतला

जळगाव : शहरातील तरुणीला कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने शहरातील एक तरुणी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र स्वॅब घेण्यापूर्वीच ही तरुणीने कोरोना वार्डातून पयालन केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संशयीत तरुणीने पयालन केल्यामूळे वैद्यकीय यंत्रणेसह पोलिसांची चांगलीच डोकेदूखी वाढली आहे. 

हेपण वाचा - पालकांनो, पावसाळ्यातही लावा बिनधास्त विवाह; पंचांगानुसार या आहेत तिथी...

शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील तरुणीला कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने त्या तरुणीला ता. 20 सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तरुणीवर उपचार सुरु असतांनाच आज सकाळच्या सुमारास ही तरुणी रुग्णालयातील कोरोना वार्डातून पसार झाल्याने वैद्यकीय यंत्रणेमध्ये खळबळ माजून गेली आहे. दरम्यान संपूर्ण यंत्रेणेने महाविद्यालयाच्या परिसरात या तरुणीचा शोध घेतला मात्र ही तरुणी मिळून न आल्याने रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. 

नक्‍की पहा - जे कोणी करू शकले नाही ते करून दाखविले या महिला डॉक्‍टरने... 

मुंबई येथून आल्याची माहिती 
कोरोना वार्डातून पलायन केलेली तरुणीने रुग्णालयात मास्टर कॉलनी परिसरातील पत्ता नमूद केला आहे. तसेच या तरुणीने आपण मुंबई येथून आल्याचे सांगितले असून त्या तरुणीला श्‍वास घेण्याचा त्रास होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पोलिसांची डोकेदूखी वाढली 
पयालन केलेल्या तरुणीला सोमवारी मध्यरात्रीच्य सुमारास कोरोना वार्डात दाखल केले होते. आज या तरुणीचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र यापूर्वीच ही तरुणी रुग्णालयातून पळून गेल्याने वैद्यकीय यंत्रणेचे धाबे दणाणून गेले आहे. 

पोलिसांकडून घेतला जातोय संशयीत तरुणीचा शोध 
कोरोना वार्डातून संशयीत रुग्ण असलेली तरुणी पळून गेल्याची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांकडून या तरुणीचा शोध सुरु असून या तरुणीने नमूद केलेल्या परिसरात पोलिसांचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital corona ward girl run