लॉकडाउननंतर विद्यापीठ परीक्षांचे होणार फेरनियोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

परीक्षा आयोजनाबाबत फेरनियोजन केले जाणार असून नव्याने तयार केलेले सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने  यापूर्वीचे वेळापत्रके रद्द समजण्यात यावे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जळगाव : लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजनाबाबत फेरनियोजन केले जाणार असून नव्याने तयार केलेले सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने  यापूर्वीचे वेळापत्रके रद्द समजण्यात यावे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नक्‍की पहा - जळगाव शहरात खुल्या मैदानांवर भरणार फळ-भाजी बाजार ! 

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लॉकडाउन सुरू केलेले असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे मार्च /एप्रिल /मे २०२० मध्ये आयोजित येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे यापूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक रद्द समजण्यात यावे. लॉकडाउन संपल्यावर शासनाच्या निर्देशानुसार  सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे फेरनियोजन करून सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल याची नोंद घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collage exam shedulde university after lockdown