थंडीचा जोर वाढला; पारा 14 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

जळगाव : गेल्या वीस दिवसांपासून कमी झालेल्या थंडीने पुन्हा कालपासून जोर धरला. दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. 20 अंशांवर गेलेला रात्रीचा पारा आता 14 अंशांवर आल्याने वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. 

जळगाव : गेल्या वीस दिवसांपासून कमी झालेल्या थंडीने पुन्हा कालपासून जोर धरला. दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. 20 अंशांवर गेलेला रात्रीचा पारा आता 14 अंशांवर आल्याने वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. 
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तसेच दक्षिण भारतात पाऊस पडल्याने जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वीस दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दूर होऊन थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, आज जळगावात 14 अंश सेल्सिअसच्या पातळीवर तापमानाची नोंद झाली. पहाटेपासून सुरू झालेली थंडी दिवसभर जाणवत राहिल्याने अनेकजण स्वेटर घालूनच काम करताना दिसून आले. थंडी वाढल्याने सकाळी व सायंकाळीही फिरणाऱ्या व व्यायाम करणाऱ्यांची आता अनेक भागांत गर्दी दिसू लागली आहे. 

थंडीचा जोर आणखी वाढणार 
थंडीची तीव्रता वाढल्याने आता स्वेटर, स्कार्फ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. गारवा पुन्हा जाणवू लागल्याने सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात अधिक घट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

सहा दिवसांतील किमान तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
1 डिसेंबर........ 18.00 
2 डिसेंबर......... 19.02 
3 डिसेंबर......... 19.00 
4 डिसेंबर......... 19.00 
5 डिसेंबर......... 19.00 
6 डिसेंबर.........19.00 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cool climate 14 degree