"अर्सेनिक अल्बम'च्या 71 हजार कुटुंबांना गोळ्या वाटप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

"अर्सेनिक अल्बम 30'च्या गोळ्यांच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनासह विविध प्रकारच्या विषाणूला प्रतिकार करून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनोशी मुकाबला करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांना आजपर्यंत 71 हजार "अर्सेनिक अल्बम 30'च्या गोळ्यांच्या बॉटल्स वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाचे इंसीडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. 

"अर्सेनिक अल्बम 30'च्या गोळ्यांच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनासह विविध प्रकारच्या विषाणूला प्रतिकार करून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जळगाव जिल्हा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पुढाकाराने निधी जमा करून "अर्सेनिक अल्बम 30' या गोळ्या तयार करण्याचे काम सुरू झाले. यापुढील काळात विविध कर्मचारी, अधिकारी संघटनांना स्वेच्छा निधी गोळा करण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांनीही मोलाचा हातभार लावला आहे. काही संस्थांनी गोळ्या भरण्यासाठी स्वयंसेवकांची मदत दिली आहे. रेडक्रॉससह विविध समाज, स्वयंसेवी संघटना मदत करीत आहे. 
गोळ्या वाटपाचे दोन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात 53 हजार 25 बॉटल्स, तर दुसऱ्या टप्प्यात 32 हजार गोळ्यांच्या बॉटल्स तयार झाल्या. त्यातील 71 हजार बॉटल्सचे वाटप पूर्ण झाले. कोरोना बाधित सापडलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला एक बॉटल या प्रमाणे दिली जात आहे. 

वाटप झालेल्या बॉटल्स अशा 
जळगाव शहर-23 हजार, भुसावळ-24 हजार, रावेर-550, एरंडोल-300, धरणगाव-1500, अमळनेर-11 हजार 700, चोपडा-5 हजार 500, नशिराबाद 200, तरसोद 600, जामनेर 600 

अशा घ्या गोळ्या 
"अर्सेनिक अल्बम- 30' या 4-5 गोळ्या सकाळी अनशापोटी घ्याव्यात. त्यांना हाताचा स्पर्श होऊ देवू नये. कुटुंबातील प्रत्येकाने सलग तीन दिवस गोळ्या घ्याव्यात. गोळ्या सुरू असताना कच्चा कांदा, कॉफी घेऊ नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Distributed tablets to 71,000 families of "Arsenic Album"