esakal | Video लॉकडाउनचा सदुपयोग : "मेगडची ऐतिहासिक कहानियां' अनुवादाची इच्छा साकार 
sakal

बोलून बातमी शोधा

maya dhuppad

कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॅकडाउनने घरातच थांबून कंटाळवाणे वाटू लागले आहे. पण या लॉकडाउनचा सदुपयोग देखील केला जात आहे. अशात नेहमी लिखाणाचा विचार करणाऱ्यांना साहित्यिक नेमके काय करताय, याची माहिती जाणून घेता येणार आहे.

Video लॉकडाउनचा सदुपयोग : "मेगडची ऐतिहासिक कहानियां' अनुवादाची इच्छा साकार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : लॉकडाउन म्हणजे घरात थांबा, सुरक्षित रहा...असा विषय बनला आहे. यामुळे घरात बसून काही वेगळे करण्याची कल्पना सुचविल्या जात आहेत. पण साहित्यिक नेहमी नव्या कल्पना आणि विचारातून लिखाण करत असतो. अशा प्रकारे अनेक दिवसांपासूनची इच्छा पुर्ण करत "मेगडची ऐतिहासिक कहानियां' हे राजस्थानी भाषेतील पुस्तकाचे मराठी अनुवाद केला. शिवाय हिंदीतील काव्य, कथांचे देखील अनुवादन कवियीत्री माया धुप्पड यांनी केले आहे. 

कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॅकडाउनने घरातच थांबून कंटाळवाणे वाटू लागले आहे. पण या लॉकडाउनचा सदुपयोग देखील केला जात आहे. अशात नेहमी लिखाणाचा विचार करणाऱ्यांना साहित्यिक नेमके काय करताय, याची माहिती जाणून घेता येणार आहे. यात कवियित्री माया धुप्पड यांनी लॉकडाउनच्या एक महिन्याच्या काळात काय लिहिले, वाचले याबद्दल "सकाळ'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

लॉकडाउनने पुर्ण वेळ साहित्यात 
साहित्यिकाला वाचण्यासोबतच लिहिण्याची वेळ जडलेले असते. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी लिहत असतात. परंतु लॉकडाउनमुळे निवांत वेळ असल्याने लिखाणासाठी त्यास पुर्णवेळ दिला जात आहे. यामुळे 27 प्रकरण असलेले डॉ. मोतीलाल मेगारीया यांचे "मेगडची ऐतिहासिक कहानियां' या राजस्थानी पुस्तकाचे एका महिन्यात मराठी अनुवादनाचे काम पुर्ण केले आहे. याशिवाय राजस्थानी लोककथा, बालकथांचे काव्यात रूपांतर करून कवितेतून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
 
सोशल मिडीयावर ऑडीओ क्‍लिप 
लिखाण करण्यासोबत एक वेगळा छंद कवियीत्री माया धुप्पड यांनी जोपासण्यास सुरवात केली आहे. जुन्या अभ्यासक्रमातील कविता स्वतः गात असून त्यांचे रेकॉर्डींग करत आहेत. हे रेकॉर्डींग व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवर शेअर करण्यास सुरवात केली आहे. अर्थात लॉकडाउनमुळे लिखाण करण्यास पुर्णवेळ देता येत असल्याचे माया धुप्पड यांनी सांगितले.