अमळनेरला चार नवे कोरोना बाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

रात्री जळगाव व अमळनेर येथील संशयितांचे वीस अहवाल प्राप्त झाले. त्यात चार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात झामी चौकातील रुग्णाच्या संपर्कातील दोन व बोरसे गल्लीतील एक पुरुष, तर कसाली मोहल्ल्यातील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे.

जळगाव : जळगाव व अमळनेर येथील रुग्णालयात आज 78 कोरोना संशयित व्यक्तींचे तीन टप्प्यांत तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; तर 73 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
आज दुपारी 20 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. यात जोगलखेडा (ता. पारोळा) येथील 14, पाचोरा येथील 4 व जामनेर, जळगावातील प्रत्येकी 1 अशा 20 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' प्राप्त झाले होते. 
दुपारी 38 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. यापैकी 37 व्यक्तींचे तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आले; तर एका व्यक्तीचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. "पॉझिटिव्ह' आढळलेला 50 वर्षीय पुरुष हा समतानगरातील "पॉझिटिव्ह' महिलेचा पिता आहे. "निगेटिव्ह' अहवालांमध्ये शेंदुर्णी येथील अकरा जणांचा समावेश आहे. याशिवाय रात्री जळगाव व अमळनेर येथील संशयितांचे वीस अहवाल प्राप्त झाले. त्यात चार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात झामी चौकातील रुग्णाच्या संपर्कातील दोन व बोरसे गल्लीतील एक पुरुष, तर कसाली मोहल्ल्यातील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. रात्रीच्या अहवालांमध्ये सोळा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यात अमळनेरचे चौदा व जळगावच्या दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 57 कोरोना बाधित, तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona new four pozitive

टॅग्स
टॉपिकस